Jasmin Bhasin: टीव्हीसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री, जिला हिंदी मालिकांनी घराघरात पोहचवले. तिच्या करिअरच्या सुरुवातीला तिला अनेक अडचणींना सामोरे जावे लागले होते. इतक्या की, एकदा तिने स्वतःचे आयुष्य संपवण्याचाही विचार केला होता. जाणून घेऊयात कोण आहे ही अभिनेत्री?
बॉलिवूड आणि टीव्ही इंडस्ट्रीमध्ये अनेकदा कलाकार आपल्या सह-कलाकारांसोबतच प्रेमात पडतात. त्यांच्या प्रेमात धर्म कधीच अडथळा ठरत नाही. असेच काहीसे या अभिनेत्रीच्या बाबतीतही झाले. एका रिअॅलिटी शोमधून तिला तिचे प्रेम सापडले आणि आता ती एका मुस्लिम अभिनेत्याला डेट करत आहे. पण तिच्या आयुष्यात एक काळ असा आला होता, जेव्हा तिने आत्महत्येचा प्रयत्न केला होता.
कोण आहे ही अभिनेत्री?
ही अभिनेत्री म्हणजे जास्मिन भसीन, तिने 'टशन-ए-इश्क' या मालिकेत ट्विंकल तनेजाची भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केले. आज ती तिचा 35 वा वाढदिवस साजरा करत आहे आणि अनेक कलाकारांनी सोशल मीडियावर तिला शुभेच्छा दिल्या आहेत. जास्मिनने अनेक लोकप्रिय शोमध्ये काम करत स्वतःची ओळख निर्माण केली आहे. तिच्या मनमोकळ्या स्वभावामुळे ती नेहमी चर्चेत राहते. मात्र, एकदा तिला तिच्या चेहऱ्यावर आलेल्या मुरुमांमुळे आणि काळ्या डागांमुळे इतकी लाज वाटायची की तिने स्वतःला संपवण्याचा विचार केला होता. अनेक ठिकाणी नकार मिळाल्यामुळे ती खचली होती आणि आत्महत्येचा प्रयत्न केला होता.
मुस्लिम अभिनेत्याशी नातं आणि लिव्ह-इन
जास्मिनच्या लव्हस्टोरीबद्दल बोलायचे झाले तर ती गेल्या काही वर्षांपासून अली गोनीला डेट करत आहे. अलीसोबत लिव्ह इनमध्ये राहत आहे. त्यांच्या लग्नाच्या चर्चा सतत रंगत असतात, जरी दोघांनीही यावर अजून अधिकृत भाष्य केलेले नाही. जास्मिन आणि अलीची मैत्री आधीपासूनच घट्ट होती. ते दोघे 'खतरों के खिलाडी'मध्ये दिसले आणि नंतर 'बिग बॉस'मध्येही एकत्र आले. बिग बॉसच्या घरातच त्यांच्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले आणि त्यांनी एकमेकांना तिथेच प्रपोजही केले.
हे ही वाचा: प्रसिद्ध संगीतकाराबरोबर झालेलं शेफालीचं लग्न; अचानक घटस्फोट अन्...; पराग-शेफालीची फिल्मी लव्ह स्टोरी
सध्या जास्मिन करण जोहरच्या 'द ट्रेटर्स' या शोमध्ये झळकत आहे. यावर्षी फेब्रुवारीमध्ये ती पंजाबी चित्रपट 'बदनाम' मध्येही दिसली होती