Marathi News> मनोरंजन
Advertisement

चापूनचोपून साडी नेसणाऱ्या रश्मिकाला नेटकऱ्यांचा प्रश्न, 'पॅन्ट घालायला विसरलीस का?

 रश्मिका मंदान्ना ही साऊथ सिनेसृष्टीतील टॉप अभिनेत्रींपैकी एक आहे.

चापूनचोपून साडी नेसणाऱ्या रश्मिकाला नेटकऱ्यांचा प्रश्न, 'पॅन्ट घालायला विसरलीस का?

मुंबई : रश्मिका मंदान्ना ही साऊथ सिनेसृष्टीतील टॉप अभिनेत्रींपैकी एक आहे. 'पुष्पा : द राइज' या चित्रपटात तिने आपल्या अभिनयाने चाहत्यांची मनं जिंकली आहेत. नुकतीच रश्मिका मुंबई एअरपोर्टवर स्पॉट झाली. याचा एक व्हिडिओ देखील समोर आला आहे. ज्यामध्ये रश्मिकाला तिच्या कपड्यांमुळे ट्रोल केलं जात आहे. ट्रोलर्स ट्रोल करत अभिनेत्रीला म्हणतायेत की, सेलिब्रिटींना थंडी जाणवत नाही. त्याचबरोबर, बरेच लोकं तिला ओळखूही शकले नाही.

या लूकमध्ये स्पॉट झाली रश्मिका मंदाना
व्हिडिओमध्ये रश्मिका मंदान्ना एअरपोर्टवर दिसत आहे. तिने हुडीसोबत शॉर्ट्स घातली आहे. ज्यामध्ये ती खूप सुंदर दिसत आहे. याचबरोबर तिने टोपी घातली आहे आणि तिच्या चेहऱ्यावर मास्क लावला आहे. काही लोकांनी रश्मिकाच्या लूकची जोरदार प्रशंसा केली, तर काहींनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली.

लोकांनी केलं जोरदाक ट्रोल
व्हिडिओवर कमेंट करत एका यूजरने लिहिलं की, तिला थंडी वाजत नाही का?, मी संध्याकाळी स्वेटर घालून घराबाहेर पडलो तरी थरथर कापतो, तर दुसर्‍या एका युजरने कमेंट करत लिहीलं की,  मॅम घाईत पॅंट घालायला विसरल्यासारखं दिसतायेत. तर अजून एकाने लिहिलं, मला वाटलं की, तो फुटबॉल खेळाडू आहे. तर अजून एकाने कमेंट केलीये, एवढ्या थंडीतही शॉर्ट्स?

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

'पुष्पा: द राइज'नंतर रश्मिका मंदान्नाची लोकप्रियता पाहून बॉलिवूडच्या अनेक निर्मात्यांनी तिला चित्रपटाच्या ऑफर दिल्या आहेत. शंतनू बागची दिग्दर्शित 'मिशन मजनू' या चित्रपटात ती सिद्धार्थ मल्होत्रासोबत दिसणार आहे. याचबरोबर, रश्मिका देखील 'गुडबाय'चा एक भाग आहे. ज्यामध्ये ती अमिताभ बच्चनसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे.

Read More