Marathi News> मनोरंजन
Advertisement

शाहरुख खानकडे बघणाऱ्या 'या' अभिनेत्रीने दिलाय 1810 कोटींचा ब्लॉकबस्टर चित्रपट, तुम्ही ओळखलं का?

शाहरुख खानकडे बघणाऱ्या या अभिनेत्रीने दिलाय 1810 कोटींचा ब्लॉकबस्टर चित्रपट. अमिताभ बच्चन-गोविंदासोबत केलंय काम. तुम्ही ओळखलं का? 

शाहरुख खानकडे बघणाऱ्या 'या' अभिनेत्रीने दिलाय 1810 कोटींचा ब्लॉकबस्टर चित्रपट, तुम्ही ओळखलं का?

Shah rukh Khan: बॉलिवूड आणि टॉलीवूड सेलिब्रिटींच्या जुन्या आठवणी म्हणजेच थ्रोबॅक फोटोंकडे बघून अनेकदा चाहत्यांच्या चेहऱ्यावर हसू उमटते. अनेकदा हे फोटो इतके खास असतात की पाहताना जुन्या आठवणी जाग्या होतात. असाच एक फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. ज्यामध्ये बॉलिवूडचा किंग शाहरुख खान एका सुंदर अभिनेत्रीसोबत दिसत आहे. तुम्ही ओळखलंत का, ही अभिनेत्री कोण आहे?

शाहरुख खानसोबत दिसणारी ही अभिनेत्री कोण?

इन्स्टाग्रामवरील monikalang02 या पेजवरून शाहरुख खानचा हा जुना फोटो शेअर करण्यात आला आहे. या फोटोत शाहरुख खानच्या उजव्या बाजूला काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये एक सुंदर तरुणी दिसत आहे. ती फोटोत शाहरुख खानकडे एकटक पाहत आहे. तिला पाहून अनेकजण गोंधळले आहेत. जरी तुम्हाला शाहरुख खानच्या शेजारी बसलेली तरुणी कोण आहे हे अद्याप समजलं नसेल तर आम्ही तुम्हाला एक हिट देऊ शकतो. या अभिनेत्रीने 'बाहुबली' चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारली होती. फोटोत दिसणारी अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून राम्या कृष्णन आहे.

या फोटोमध्ये राम्या अतिशय तरुण आणि आकर्षक दिसत असून शाहरुखसोबतचा हा तिचा फोटो चाहत्यांना खूपच आकर्षित करत आहे. सध्या या फोटोची सोशल मीडियावर प्रचंड चर्चा रंगली आहे. 

'बाहुबली' चित्रपटात साकारली खास भूमिका

राम्या कृष्णन ही एक सुप्रसिद्ध दक्षिणात्य अभिनेत्री आहे. तिने तेलुगू, तमिळ, कन्नड, मल्याळम आणि हिंदी अशा अनेक भाषांतील 200 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. वयाच्या अवघ्या 13व्या वर्षी राम्याने 1983 मध्ये 'नेरम पुलरुंबोल' या मल्याळम चित्रपटातून आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली होती. बॉलिवूडमध्ये देखील तिने वजूद, बडे मियाँ छोटे मियाँ, शपथ, लोहे का दिल, चाहत, परंपरा, खलनायक आणि दयावान यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. मात्र, 'बाहुबली'मध्ये तिने शिवगामी देवीची दमदार भूमिका साकारल्यावर तिच्या लोकप्रियतेत मोठी वाढ झाली.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

राम्या कृष्णनला तिच्या अभिनयासाठी 4 फिल्मफेअर पुरस्कार, 3 नंदी पुरस्कार आणि 1 तमिळनाडू राज्य चित्रपट पुरस्कार मिळाले आहेत. अभिनयासोबतच त्या एक प्रशिक्षित भरतनाट्यम आणि कुचिपुडी नृत्यांगना देखील आहेत.

Read More