Marathi News> मनोरंजन
Advertisement

Bappi Lahri यांच्या नंतर पुन्हा एक वाईट बातमी, या प्रसिद्ध अभिनेत्याचं निधन

प्रसिद्ध चित्रपट अभिनेत्याचं गुरुवारी हृदयविकाराच्या झटक्याने अचानक निधन झालं आहे.

Bappi Lahri यांच्या नंतर पुन्हा एक वाईट बातमी, या प्रसिद्ध अभिनेत्याचं निधन

मुंबई : प्रसिद्ध मल्याळम चित्रपट अभिनेता प्रदीप केआरचं गुरुवारी हृदयविकाराच्या झटक्याने अचानक निधन झालं आहे. वयाच्या 61 व्या वर्षी अभिनेत्याने अखेरचा श्वास घेतला.  कोट्टायम प्रदीप या नावाने अभिनेता प्रसिद्ध होता. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सकाळी प्रदिपला रुग्णालयात नेण्यात आलं मात्र तिथेच त्याचा मृत्यू झाला.

प्रदीपच्या पश्चात पत्नी व दोन मुलं आहेत. या अभिनेत्याला संवाद देण्यासाठी विशेष पसंती मिळाली. तो कोट्टायम जिल्ह्यातील होता. थिएटर आर्टिस्ट म्हणून आपल्या करिअरची सुरुवात करणाऱ्या प्रदीपने २००१ मध्ये आय व्ही शशी याच्या दिग्दर्शनाखालील 'ई नाडू इनले वारे' या चित्रपटातून चित्रपटांकडे वळले. यानंतर त्यांनी कमीत-कमी 60 चित्रपटांमध्ये छोट्या पण महत्त्वाच्या भूमिका साकारल्या.

या सिनेमातून मिळालं नाव 
'विन्नाईथांडी वारूवाया' हा तमिळ चित्रपट त्याच्या करिअरमधील मैलाचा दगड ठरला.

fallbacks

मुख्यमंत्र्यानी वाहिली श्रद्धांजली
अभिनेत्याच्या निधनाबद्दल चाहते, मंत्री, लोकप्रतिनिधी आदींनी शोक व्यक्त केला आहे. मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटलं आहे की, प्रदीप हा एक उत्कृष्ट कलाकार होता ज्याने आपल्या अभिनयाने छोट्या भूमिका अवस्मरणीय बनवल्या. ममूटी, मोहनलाल और पृथ्वीराज सुकुमारन यांच्यासह अनेक कलाकारांनी सोशल मीडियावर प्रदीपला श्रद्धांजली वाहिली आहे.

Read More