Marathi News> मनोरंजन
Advertisement

ईशा अंबानींची बेस्ट फ्रेंड आहे ही बॉलिवूड अभिनेत्री; फोटो शेअर करताच झाली होती ट्रोलिंगची शिकार

Kiara Advani and Isha Ambani: कियारा अडवाणी आणि इशा अंबानी या दोघींची मैत्री शाळेपासून आहे. एका मुलाखतीत कियाराने त्यांच्या मैत्रीबाबतही भाष्य केलं होतं.   

ईशा अंबानींची बेस्ट फ्रेंड आहे ही बॉलिवूड अभिनेत्री; फोटो शेअर करताच झाली होती ट्रोलिंगची शिकार

Kiara Advani and Isha Ambani: अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नात संपूर्ण बॉलिवूड एकटवलं होतं. पण तु्म्हाला माहितीये का अंबानी कुटुंब आणि बॉलिवूडमधील अनेक कलाकारांची कित्येक वर्षांपासून मैत्री आहे. सध्याची आघाडीची अभिनेत्री ईशा अंबानी यांची बालपणाची मैत्रिण आहे. बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणी आणि ईशा अंबानी यांच्यात घट्ट मैत्री आहे. कियाराने 2018मध्ये ईशा अंबानी यांच्या साखरपुड्यानंतर एक नोट लिहली होती. बालपणाचा एक फोटो शेअर करत कियाराने ही पोस्ट केली होती, त्यात म्हटलं होतं की, काही लोक खास असतात. ते लोक तुमच्या आयुष्यातील महत्त्वाचा भाग असतात. तुम्ही त्यांच्यासोबतच मोठे होतात. माझी सगळ्यात जुनी मैत्रिण आजही तितकीच केअरिंग आणि प्रेमळ आहे तसंच समजूतदारसुद्धा. ईशू तुझ्यातील बालपण कधीच संपू देऊ नकोस, असं कियाराने म्हटलं होतं. 

ईशा अंबानी आणि कियारा अडवाणी बालपणीच्या मैत्रिणी आहेत. दोघी एकाच शाळेत शिकायला होत्या. एकमेकांच्या घरीदेखील येणे-जाणे होते. 2018मध्ये ईशा अंबानीच्या साखरपुड्यानिमित्ताने कियारा अडवाणीने पोस्ट शेअर केली होती. त्यानंतर ईशा अंबानी यांनीदेखील कियारा आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांच्या लग्नाचा फोटो शेअर करुन 6 फेब्रुवारी 2023 मध्ये त्यांना लग्नाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. परिणीती चोप्रा, श्रद्धा कपूर आणि कपूर सिस्टर्सदेखील ईशा अंबानी यांच्या मैत्रिणी आहेत. इतंकच नव्हे तर श्लोका मेहतादेखील त्यांची बालपणीची मैत्रिण आहे. 

ईशा अंबानी यांची खास मैत्री

बीसीसी एशियन नेटवर्कला दिलेल्या एका मुलाखतीत, कियाराने त्यांच्या मैत्रीबद्दल बोलताना सांगितले होते की, मला वाटतं की आज सोशल मीडियाच्या माध्यामातून सगळेच एकमेकांना ओळखतात. त्यामुळं जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीबद्दल बोलता तेव्हा लगेचच तुमच्याविषयीची दृष्टीकोन बदलतो. सोशल मीडिया असाच आहे. जर मी माझ्या एखाद्या मैत्रिणीसोबतचा फोटो पोस्ट केला. ती भारतातील सर्वात श्रीमंत कुटंबातील आहे. तेव्हा लोक म्हणतात की मी तिच्या नावाने मी माझी ओळख बनवण्याचा प्रयत्न करते. मी माझे करिअर स्वतःच्या हिमतीवर बनवले आहे. ईशा अंबानी माझी मैत्रिण आहे. मला फरक पडत नाही की आमच्याबद्दल लोक काय विचार करतात. कारण आमची मैत्री घट्ट आहे. 

Read More