Marathi News> मनोरंजन
Advertisement

आपली मुलं हरवली... या प्रसिद्ध सेलिब्रिटींकडून सर्वात मोठी चूक

 यापूर्वी या जोडप्याला एक मुलगीही होती.

 आपली मुलं हरवली... या प्रसिद्ध सेलिब्रिटींकडून सर्वात मोठी चूक

मुंबई : आई होणे किंवा मुलांचे संगोपन करणे सोपे काम नाही. या प्रवासात अनेकवेळा असे घडते जेव्हा तुम्हाला स्वतःला अपयशी वाटते, कधी कधी काही गोष्टींमध्ये तुम्ही पास होता. पालकत्वामध्ये, तुमच्या मुलासाठी काय योग्य असेल हे पाहण्यासाठी तुम्हाला प्रयोग करत राहावे लागतात.

सगळ्यांकडून चुका होतात आणि पालकत्वातही काही चुका होतात. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे तुम्ही तुमच्या चुकांमधून शिकता आणि त्यांची पुनरावृत्ती होऊ देत नाही.काही सेलिब्रिटी आहेत ज्यांनी आपल्या मुलांचे संगोपन करताना मोठ्या चुका केल्या आहेत.

 ताहिरा कश्यप

fallbacks

लोकप्रिय अभिनेता आयुष्मान खुरानाची पत्नी ताहिरा कश्यपने आपल्या मुलासोबत अशी चूक केली की, त्याबद्दल अनेकांना आश्चर्य वाटेल.
ताहिरा नेहमीच तिच्या आयुष्यातील अनुभवांबद्दल मोकळेपणाने बोलताना दिसते. अलीकडेच ताहिराने खुलासा केला होता की, ती एकदा तिच्या मैत्रिणींसोबत लंचसाठी गेली होती. यादरम्यान ती आपल्या मुलाला रेस्टॉरंटमध्येच विसरली.

हॅले बेरी
सेलिब्रिटी हॅले बेरी एकदा आपल्या मुलीसोबत शॉपिंगला गेली होती. आपली मुलगी कुठेतरी हरवली आहे हे लक्षात येताच तिला धक्का बसला. हॅली म्हणते की तिची मुलगी जवळच होती आणि काही मिनिटांत ती सापडली.

जेनिफर गार्नर

fallbacks

अभिनेत्री, निर्माता जेनिफर गार्नरला तीन मुले आहेत आणि तिने सांगितले की कधीकधी ती तिच्या तिसऱ्या मुलाला विसरते. आपल्या दोन मोठ्या मुलांसोबत खेळत असताना ती कधी कधी तिसऱ्या मुलाला कुठेतरी सोडून गेली आहे हे विसरते.

नेहा धुपिया

fallbacks

नेहा धुपिया आणि अंगद बेदी 2021 साली दुसऱ्या मुलाचे पालक बनले आहेत. यापूर्वी या जोडप्याला एक मुलगीही होती. नेहा धुपियाने एका मुलाखतीत सांगितले की, ती आणि तिचे पती एकदा त्यांच्या मुलीसोबत ड्राईव्हसाठी बाहेर गेले होते. पण तेथून परत आल्यानंतर त्यांची मुलगी त्यांच्यासोबत नव्हती.

जर तुमचे मुल तुमचा फोन नंबर लक्षात ठेवण्याइतके हुशार झाले असेल तर त्याला तुमचा नंबर नक्की सांगा. घरातून बाहेर पडताना जर तो तुमच्यापासून दूर गेला तर तो तुमचा फोन नंबर देऊन तुमच्यापर्यंत पोहोचू शकतो.अशा प्रकारच्या मोठ्या चुका या सेलिब्रिटींकडून झाल्या आहेत. ज्याबद्दल त्यांनी मोकळेपणाने सांगत इतरांना अलर्ट केले आहे.

Read More