Singham Again : रोहित शेट्टी लवकरच त्याच्या सर्वात प्रसिद्ध फ्रँचायझी सिंघमच्या पुढील भागाद्वारे पुनरागमन करणार आहे. जेव्हापासून 'सिंघम अगेन'ची घोषणा करण्यात आली आहे, तेव्हापासून चाहते याबद्दल खूप उत्सुक असल्याचं दिसत आहे. आता प्रेक्षकांचा उत्साह दुप्पट करण्यासाठी निर्मात्यांनी चित्रपटाच्या सेटवरील काही फोटो शेअर केले आहेत.
सिंघम अगेनच्या सेटवरील नवीन फोटो आले समोर
रिलायन्स एंटरटेनमेंटने हे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. पहिल्या फोटोत आपण पाहू शकतो की, बंकर व्हॅनने भिंत कशी फोडून एन्ट्री कशी घेतली. तर दुसऱ्या फोटोत चित्रपटाचा निर्माता रोहित शेट्टी हात दाखवून बंकर व्हॅन थांबवताना दिसत आहे. त्यामुळे या सिनेमात रोहित पहिल्यांदाच दिसणार असल्याचं बोललं जात आहे.
लोकांनी अजय देवगणच्या एन्ट्री सीनबद्दल सांगितलं
हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. हे फोटो शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, 'काम अजूनही सुरू आहे. हे फोटो पुन्हा शेअर करत एका यूजरने कमेंट करत लिहीलं की, हा चित्रपटातील अजय देवगणच्या एन्ट्री सीन आहे. तेव्हापासून हे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. हा चित्रपटाचा क्लायमॅक्स सीन असल्याचं अनेकांचं म्हणणं आहे.
WORK IN PROGRESS…#SinghamAgain
— Reliance Entertainment (@RelianceEnt) October 27, 2023
- #RohitShetty pic.twitter.com/jI62eys6Fc
दीपिका-टायगर करणार धमाल
अलीकडेच दीपिका पदुकोण आणि टायगर श्रॉफ यांनी या चित्रपटातील त्यांचा पहिला लूक शेअर केला होता, ज्याची बरीच चर्चाही झाली होती, तर रोहित शेट्टीच्या कॉप युनिव्हर्सचा हा 5 वा चित्रपट आहे. याआधी सिंघम, सिंघम रिटर्न्स, सिम्बा आणि सूर्यवंशी हे सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. पुढील वर्षी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.