Marathi News> मनोरंजन
Advertisement

कपूर कुटुंबातील पहिला सदस्य ज्याने सिनेमा सोडून शिक्षकी पेशात चालवला आपलं खणखणीत नाणं; शिक्षक होण्यासाठी सोडले 2 सिनेमे

कपूर कुटूंब म्हटलं की, पहिला विचार समोर येतो तो म्हणजे सिनेमा. पण तुम्हाला माहिती आहे का? या कुटुंबातील एका व्यक्तीने शिक्षक होण्यासाठी चक्क 2 सिनेमांना नाकारलं होतं. कोण आहे ती व्यक्ती आणि आज ती काय करते? 

कपूर कुटुंबातील पहिला सदस्य ज्याने सिनेमा सोडून शिक्षकी पेशात चालवला आपलं खणखणीत नाणं; शिक्षक होण्यासाठी सोडले 2 सिनेमे

Kapoor Family : बॉलिवूड इंडस्ट्रीत आपण अनेक दिग्गज कलाकार पाहिले आहेत. पण बॉलिवूडमधील एक कुटुंबच असं आहे जे वर्षानुवर्षे प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. आज आपण अशाच एका कुटुंबाविषयी बोलणार आहोत जे दीर्घकाळापासून इंडस्ट्रीत आहेत. त्यांनी इंडस्ट्रीला अनेक दिग्गज आणि प्रतिभावान स्टार दिले आहेत. हे कुटुंब आजही लोकांच्या हृदयावर राज्य करत असून अभिनयाच्या बाबतीत त्यांच्याकडून प्रेक्षकांना देखील अनेक अपेक्षा आहेत.

अलीकडेच कपूर कुटुंबांनी राज कपूर यांची 100 वी जयंती मोठ्या थाटात साजरी केली. राज कपूर यांनी मनोरंजन क्षेत्राला खूप काही दिले आहे. राज कपूर यांच्या जन्मशताब्दी सोहळ्यात आलिया भट्ट, करीना कपूर, रणबीर कपूर, सैफ अली खान, नीतू कपूर, करिश्मा कपूर, रिद्धिमा कपूर साहनी, भरत साहनी, रीमा जैन, आदर जैन आणि अनेक सेलिब्रिटी उपस्थित होते. पण तुम्हाला माहित आहे का? कपूर कुटुंबातील एक असा सदस्य आहे जे मनोरंजनाच्या या झगमगाटापासून फार दूर आहे.

fallbacks

कोण आहे ती व्यक्ती?

कपूर कुटुंबाने बॉलीवूड इंडस्ट्रीवर राज्य केले आहे, परंतु शिक्षण हा कधीही कुटुंबातील सदस्यांचा मजबूत मुद्दा नव्हता. त्याच्या कुटुंबात अनेक सुपरस्टार आहेत पण त्यापैकी फक्त एकच पदवीधर आहे. ती व्यक्ती आहे ज्येष्ठ अभिनेते शम्मी कपूर यांचा मुलगा आदित्य राज कपूर. कपूर कुटुंबातील पहिल्या पिढीतील ते एकमेव व्यक्ती आहेत ज्यांनी उच्च शिक्षण पूर्ण केले आहे. वयाच्या 67 व्या वर्षी केले आदित्य राज यांनी इग्नू मुक्त विद्यापीठातून तत्त्वज्ञानाची पदवी प्राप्त केली असून ते भारतातील सर्वात जुने पदवीधर बनले.

आता ते पेशाने शिक्षक बनले आहेत. ज्येष्ठ अभिनेते शम्मी कपूर आणि गीता बाली यांचा मुलगा आहेत. शालेय शिक्षणानंतर ते 'बॉबी'मध्ये काका राज यांना असिस्ट करत होता. एवढंच नव्हे तर त्यांनी 'धरम करम' आणि 'सत्यम शिवम सुंदरम'मध्येही छोट्या भूमिका केल्या. नंतर व्यवसाय करण्यासाठी त्यांनी चित्रपटांपासून दुरावले. 2010 मध्ये, ते पुन्हा एकदा अभिनयात आले आणि 'चेस' नावाच्या चित्रपटात काम केले. तसेच 2014 मध्ये 'एव्हरेस्ट' नावाचा टीव्ही शो देखील केला होता. मग त्यांनी महामारीच्या अगदी आधी अभ्यास करण्यासाठी अभिनय सोडला आणि आपला शिक्षकी पेशा पुढे नेला. 

कपूर कुटुंबात कोण किती शिकलंय?

राज कपूर यांनी बालपणातच चित्रपटांमध्ये प्रवेश केला होता, त्यामुळे त्यांनी शाळा पूर्ण केली नाही आणि शिक्षण अर्धवटच सोडलं.राज कपूर यांनी आरके स्टुडिओची स्थापना केली. इतकेच काय, त्यांनी आपल्या कुटुंबातील इतर सदस्यांना, त्याचे भाऊ शम्मी आणि शशीपासून ते मुलगे ऋषी, रणधीर आणि राजीव यांना शाळा सोडण्यासाठी आणि सहाय्यक संचालक म्हणून त्यांच्याकडे काम करण्यासाठी प्रोत्साहित केले. रणबीर कपूरसोडून कपूर कुटुंबातील कोणीही शाळा पूर्ण केली नाही. पण बॉलीवूडच्या स्वप्नांसाठी त्याने कॉलेजही सोडलं.

 

Read More