Marathi News> मनोरंजन
Advertisement

'या' चित्रपटाने वाचवलं अमिताभ बच्चन यांचं करिअर; त्याच नावाने बनलेला नवा चित्रपट मात्र ठरला फ्लॉप

amitabh bachchan's career: डेव्हिड धवनच्या या चित्रपटामुळे अमिताभ बच्चन यांच्या बुडत्या करिअरला एक नवे वळण मिळाले. ज्यामुळे त्यांचे कर्जही माफ झाले. मात्र, त्या चित्रपटच्या नावानेच आणखी एक चित्रपट आला तर तो चित्रपट पुर्णपणे फ्लॉप ठरला. पाहूयात कोणता होता तो चित्रपट?   

'या' चित्रपटाने वाचवलं अमिताभ बच्चन यांचं करिअर; त्याच नावाने बनलेला नवा चित्रपट मात्र ठरला फ्लॉप

अमिताभ बच्चन यांना त्यांच्या अ‍ॅक्टिंग कारकिर्दीत अनेक चढ-उतारांचा सामना करावा लागला आहे. 70 आणि 80 च्या दशकात त्यांना 'अँग्री यंग मॅन' म्हणून ओळख मिळाली होती. पण 90 च्या दशकाच्या सुरुवातीला त्यांनी सुरू केलेल्या ABCL (Amitabh Bachchan Corporation Ltd) प्रॉडक्शन कंपनीमुळे आर्थिक संकटात सापडले.

या कंपनीचा उद्देश भारतीय सिनेमाला एक कॉर्पोरेट स्ट्रक्चर देणे हा होता. मात्र, काही अयोग्य निर्णय आणि फ्लॉप प्रोजेक्ट्समुळे ही कंपनी डगमगली. या काळात त्यांच्यावर सुमारे 90 कोटी रुपयांचे कर्ज जमा झाले होते. एवढंच नाही, तर त्यांच्यावर काही कायदेशीर कारवाईची वेळही आली होती आणि यामुळेचं बिग बी काही दिवस पूर्णपणे घरात बंद होते. या अनेक अपयशामुळे अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या अॅक्टींग करिअरमधून ब्रेक घेण्याचा विचार केलेला. या कठीण प्रसंगाला झुंज देत 5 वर्षांच्या ब्रेकनंतर बिग बी 'मृत्यूदाता' या चित्रपटातून कमबॅक केले तर त्यांचा तोही चित्रपट फ्लॉप ठरला. 

या कठीण काळात डेव्हिड धवन यांनी बिग बींसमोर 'बडे मियाँ छोटे मियाँ' हा चित्रपट करण्याची कल्पना ठेवली. हा चित्रपट गोविंदाच्या कॉमिक टाइमिंगने भरलेला आणि बच्चन यांचा अ‍ॅक्शन-पंचेसने सजलेला होता. या चित्रपटामुळे अमिताभ बच्चन पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या मनात घर करु लागले. हा चित्रपट 1998 मधील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला. ज्याने जगभरात 35.14 कोटींची कमाई केली. गोविंदा आणि बिग बी व्यतिरिक्त रम्या कृष्णन आणि रवीना टंडन मुख्य भूमिकेत होते.  या यशानंतर बिग बींनी 'कभी खुशी कभी गम', 'बागबान', 'ब्लॅक', 'सरकार' यांसारख्या अनेक यशस्वी चित्रपटांमध्ये काम करत त्यांचं करिअर पुन्हा उभं केलं.

दुसरीकडे, 2024 मध्ये अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफच्या प्रमुख भूमिकेत आलेल्या 'बडे मियाँ छोटे मियाँ' या चित्रपटाला भरघोस प्रमोशन, व्हिज्युअल्स आणि मोठं बजेट असूनही अपेक्षित यश लाभलं नाही. प्रेक्षकांनी पटकथा, संवाद आणि अ‍ॅक्शनच्या ओव्हरडोजमुळे टीका केली. प्रेक्षकांना मूळ चित्रपटातील गमतीशीर केमिस्ट्री आणि नैसर्गिक अभिनयाची कमतरता जाणवली.

'बडे मियाँ छोटे मियाँ (1998)' यशाचं गुपित:
अमिताभ बच्चन आणि गोविंदाची पहिल्यांदाच जोडी  
विनोदी आणि अ‍ॅक्शनचा परफेक्ट बॅलन्स  
डेव्हिड धवनच्या स्टाईलचा प्रभावी वापर  
हिट गाणी - 'ओ माखना', 'बडे मियाँ छोटे मियाँ'

हे ही वाचा: सारा अली खान पुन्हा एकदा गुवाहाटीच्या कामाख्या देवी दर्शनाला; बोटीत बसून घेतला ब्रह्मपुत्रा नदीचा आनंद

2024 च्या चित्रपटाचं अपयश:
कमकूवत पटकथा 
अनावश्यक अ‍ॅक्शन सीन
ओरिजिनल चित्रपटाशी तुलना झाल्याने प्रेक्षकांच्या  वाढलेल्या अपेक्षा

प्रेक्षक जुन्या आणि नव्या 'बडे मियाँ छोटे मियाँ' चित्रपटांची तुलना करु लागले. हा चित्रपट त्यामुळे बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला. या चित्रपटाचे बजेट 350 कोटी रुपये होते. मात्र, या चित्रपटाने फक्त 111.49 कोटी रुपये कमावले.

Read More