Marathi News> मनोरंजन
Advertisement

.....अन् सलमानसाठी लकी ठरली 'ती' अभिनेत्री

काही वर्षांतच.... 

.....अन् सलमानसाठी लकी ठरली 'ती' अभिनेत्री

मुंबई : अभिनेता सलमान खान याने आजवर अनेक नव्या चेहऱ्यांना त्याच्या चित्रपटांमध्ये काम करण्याची संधी दिली आहे. अनेकांच्या कारकिर्दीला भाईजाननेच कलाटणीही दिली आहे. पण, तुम्हाला माहित आहे का, अशी एक अक अभिनेत्री आहे जी चक्क सलमानच्या कारकिर्दीला कलाटणी देऊन गेली होती. ही बाब अनेकांच्या लक्षातही आली नसावी, पण तिच्यासोबतचा सलमानचा चित्रपट जवळपास पंधरा वर्षांनंतरही तितकाच लोकप्रिय आहे.

'दबंग खान'चा तो चित्रपट म्हणजे 'तेरे नाम', आणि सलमानसाठी यशाचं दार उघडणारी ती अभिनेत्री म्हणजे भूमिका चावला. ज्याप्रमाणे 'तेरे नाम'मधील 'राधे'  हा 'निर्जरा'च्या प्रेमात पड़ला होता, त्याचप्रमाणे चाहत्यांच्या मनावरही भूमिकाने साकारेल्या निर्जराची भुरळ पडली होती. 

तेरे नामने फक्त भूमिकालाच नवी ओळख दिली नाही, तर सलमानच्या कारकिर्दीलाही या चित्रपटाने कलाटणी दिली. नशीबाची खेळी म्हणा किंवा निव्वळ योगायोग, पण सलमाच्या यशासाठी त्या वेळी भूमिकालाही तितकंच श्रेय देण्यात आलं होतं असं म्हटलं जातं. पुढे भूमिकाने सलमानसोबत दिल ने जिसे अपना कहा या चित्रपटातही 

fallbacks

१९९९ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'हम साथ साथ है' या चित्रपटानंतर मोठ्या प्रमाणात यश मिळवणारा 'तेरे नाम' हा पहिलाच चित्रपट ठरला होता. २००० ते २००२ या काळात बॉक्स ऑफिसवर आलेल्या सलमानच्या चित्रपटांना चांगलाच दणका मिळाला होता. त्यामुळे 'तेरे नाम' हा खऱ्या अर्थाने त्याच्या कारकिर्दीतील मैलाचा दगड ठरला, असं म्हणायला हरकत नाही. 

Read More