Marathi News> मनोरंजन
Advertisement

Lockdown : जान्हवी कपूरला घरीच थांबवण्यासाठी बहिणीची नवी शक्कल

पाहा व्हिडिओ .....  

Lockdown : जान्हवी कपूरला घरीच थांबवण्यासाठी बहिणीची नवी शक्कल

मुंबई : अभिनेत्री जान्हवी कपूर हिने काही दिवसांपूर्वीच सोशल मीडियावर एक पोस्ट लिहित सध्याच्या काळात  आपल्याला कशा प्रकारे अनेक गोष्टींची किमत कळली ही भावना व्यक्त केली. सततचं चित्रीकरण, परदेश दौरे या साऱ्याला कुठेतरी विराम मिळाला आणि जान्हवी घरात थांबली. मुळात तिच्या या घरात थांबण्यामागेही एक कारण आहे. ते म्हणजे तिची बहीण खुशी कपूर. 

खुशी आपल्या बहिणीला म्हणजेच जान्हवीला घरी थांबवण्यासाठी एक भलतीच शक्कल लढवते, ज्याची चर्चा आता सोशल मीडियावर होत आहे. या व्हिडिओमध्ये खुशी ही जान्हवीच्या हाता.ला चावताना दिसत आहे, जेणेकरुन ती घराबाहेर जाणार नाही. बहिणींची ही धमाल मस्ती सध्या भलतील रंगली असून, आता येत्या काळात या होम क्वारंटाईनदरम्यानचा काळ त्या कसा व्यतीत करणार हे पाहणं मजेशीर असणार आहे.

कोरोना व्हायरसच्या या आव्हानात्मक काळात सर्व व्यवहार ठप्प झाल्या.मुळे घरात राहणं अनेकांसाठी आव्हानात्मक असेल. पण, ही वेळही टळेल या एका सकारात्मक भावनेने घरातच राहून या क्षणांचाही मनमुराद आऩंद लुटणं कधीही फायद्याचं ठरेल हेच या सर्व सेलिब्रिटी मंडळींच्या पोस्ट सांगत आहेत. 

 
 
 
 

A post shared by @ janhvikapoorslays__ on

कोरोनाच्या संसर्गाची साखळी तोडण्यासाटी घरातच राहून त्याच्याशी लढा देणं शक्य असल्यामुळे या एका मार्गाने प्रशासनाला नक्की साथ द्या आणि तुमची जबाबदारी पार पाडा हेच जान्हवी आणि इतरही बरेच सेलिब्रिटी वारंवार विविध मार्गांनी सांगत आहेत. 

#घरीराहा_सुरक्षितराहा 

 

Read More