Marathi News> मनोरंजन
Advertisement

रफ्तार, बादशहा नाही... 'हा' आहे भारतातला सर्वाधिक श्रीमंत रॅपर

Higest Paid Rappers in India: सध्या रॅपर्सचा जमाना आहे. अनेकांना सध्या रॅपिंग करण्याचे वेध लागले आहेत. किंबहुना तरूणाईमध्ये तर त्यांची प्रचंड क्रेझ आहे. रफ्तार, बादशहा, हनी सिंग अशा भारतीय रॅपर्सचीही सर्वत्र चर्चा आहे. परंतु तुम्हाला माहितीये का की हे रॅपर्स नक्की किती मानधन घेतात आणि यातही सर्वाधिक मानधन घेणारं कोण आहे ते? 

 रफ्तार, बादशहा नाही... 'हा' आहे भारतातला सर्वाधिक श्रीमंत रॅपर

Higest Paid Rappers in India: सध्याचा जमाना हा रॅपर्सचा आहे. त्यातून आता चर्चा आहे ती म्हणजे अशाच अनेक रॅपर्सची. आताही आपण अशाच काही रॅपर्सबद्दल जाणून घेणार आहोत आणि सोबतच त्यांच्या नेटवर्थबद्दलही जाणून घेणार आहोत. आता संगीतही फार बदलते आहे. त्यातून वर म्हटल्याप्रमाणे रॅप सॉग्नचा सर्वत्र जमाना आहे. आता सोशल मीडियावर तुम्हाला फक्त असे रॅप सॉग्स हे जास्त पाहायला मिळतील. त्यातून सध्या चर्चा आहे ती म्हणजे अशाच काही लोकप्रिय रॅपर्सची. तुम्हाला माहितीये का की या लोकप्रिय रॅपर्सपैंकी नक्की गर्भश्रीमंत रॅपर आहे तरी कोण? तुमच्या प्लेलिस्टमध्येही या रॅपर्सची गाणी ही असतीलच. तेव्हा चला तर मग पाहुया की नक्की या गर्भश्रीमंत रॅपर्समध्ये नक्की कोणाचा नंबर आहे. यावेळी सध्या त्यांची जोरात चर्चा रंगलेली पाहायला मिळाली आहे. त्यातून आता चर्चा आहे ती म्हणजे बादशहा, रफ्तार यांच्यासारख्या रॅपर्सची. 

परंतु यातही कोण जास्त श्रीमंत आहे हे आपण पाहुया. असे अनेक रॅपर्स आहेत जे 90 च्या दशकातही फार लोकप्रिय झाले होते. त्यांची आताही जोरात चर्चा रंगलेली असते. सध्या सोशल मीडियावर हे रॅपर्स चांगलेच ट्रेण्डिंग असतात. फक्त बॉलिवूड किंवा सोशल मीडियावरच नाही तर क्लब्स असोत किंवा पार्टी या रॅपर्सची गाणी ही वाजतातच वाजतात. या कलाकारांचे आवज आणि त्यांची गाणी ऐकण्यासाठी तर तरूण लोकं फारचं उत्सुक असतात. त्यामुळे त्यांची जोरात चर्चा ही रंगलेली असते. अशातच आता चर्चा आहे ती म्हणजे त्यांच्या मानधनाची. यावेळी हे कलाकार आपल्या या नव्या आधुनिक कलेच्या माध्यमातून नक्की किती पैसे कमावतात? रफ्तार आणि बादशहाच नाही तर हनी सिंगदेखील तितकाच लोकप्रिय आहे. 

हेही वाचा : राजपाल यादवने सांगितली कैद्यांसोबत घालवलेली काळरात्र, म्हणाला, 'तीन महिने...'

आम्ही ज्या रॅपरबद्दल सांगत आहोत त्याचे नावं आहे बाबा सहगल. त्यानं रॅपर होण्यासाठी पंजाबच्या अनेक तरूणांना प्रेरित करण्याचा प्रयत्न केला आहे. यांच्या म्युझिक व्हिडीओजना प्रेक्षकांकडून प्रचंड पसंती मिळालेली आहे. त्यांचे अल्बम्स तर एकामागून एक हीट राहिले आहेत. तर दुसरीकडे आहे तो म्हणजे हनी सिंग. हनी सिंग हा देशातला सर्वात लोकप्रिय रॅपर आहेच सोबतच सर्वाधिक मानधन घेणाराही आहे. 

'कलास्टार' आणि 'देसी कलाकार' या दोन गाण्यांमुळे त्याला प्रचंड लोकप्रियता मिळाली होती. त्याच्याकडे असे मोठे चार्टबस्टर्स आहेत. त्याच्या संपत्तीबद्दल बोलायचे झाले तर त्याच्याकडे 203 कोटींची संपत्ती आहे. बादशहाकडे 41.3 इतकी संपत्ती आहे. रफ्तारकडे 80 कोटींची संपती आहे. तर एमसी स्टॅनकडे 15-20 कोटी रूपयांची संपत्ती आहे. डिवाईनकडे 8.2 कोटी रूपयांची संपत्ती आहे.  

Read More