Marathi News> मनोरंजन
Advertisement

यासाठी अनुराग कश्यपने रवी किशनला 'गँग ऑफ वासेपुर' मध्ये दिला नाही रोल

रवी किशन भोजपुरी आणि हिंदी सिनेमातील लोकप्रिय चेहरा. 

यासाठी अनुराग कश्यपने रवी किशनला 'गँग ऑफ वासेपुर' मध्ये दिला नाही रोल

मुंबई : रवी किशन भोजपुरी आणि हिंदी सिनेमातील लोकप्रिय चेहरा. 

लवकरच अनुराग कश्यपच्या 'मुक्काबाज' या सिनेमांत बॉक्सर कोचच्या भूमिकेत दिसणार आहे. एका बाजूला अनुराग कश्यपने एका दमदार कॅरेक्टरसाठी रवी किशनची निवड केली असली तरी ही गँग ऑफ वासेपुर या सिनेमांत मात्र नाकारलं होतं. आणि याचं मुख्य कारण होतं रवी किशनचे नखरे. जे अनुराग कश्यपला नकोसे होते 

बुधवारी मुक्काबाज या सिनेमाची संपूर्ण टीम दिल्लीमध्ये प्रमोशनसाठी होती. यावेळी रवी किशनने या गोष्टीचा खुलासा केला की, अनुराग कश्यपच्या गँग ऑफ वासेपुर या सिनेमांत होतो. मात्र माझा तो रोल माझ्या हातून गेला. याचं कारण अनुरागने सांगितलं की, रवी किशनचे नखरे. 

अनुराग कश्यपला असे वाटत होते की, रवी खूप मोठा स्टार आहे. त्याला मोठी व्हॅनिटी व्हॅन हवी. कायम 5 ते 6 मुली माझ्या आजूबाजूला असतात. मी ज्यूसचा ग्लास हातात घेतल्या शिवाय खाली उतरत नाही. मात्र असं काही नाही शेवटी त्यांनी मला त्यांच्या सिनेमांत घेतलंच. त्यांनी मला घाम गाळत खूप काम करायला लावलं आहे. 

Read More