Marathi News> मनोरंजन
Advertisement

जिच्याकडे लहान असतांना एकही खेळणं नव्हत, अश्या अभिनेत्रीने 2 चित्रपटामधून कमावले 1300 कोटी

फोटोत दिसणाऱ्या अभिनेत्रीला नॅशनल क्रश म्हणून ओळखले जाते. जिने 2 ब्लॉकबस्टर चित्रपट दिलेत. ज्यांनी बॉक्स ऑफिसवर 1300 कोटींची कमाई केली. परंतु, तिच्याकडे लहानपणी खेळणे घेण्यासाठी देखील पैसे नव्हते. कोण आहे ही अभिनेत्री? वाचा सविस्तर 

जिच्याकडे लहान असतांना एकही खेळणं नव्हत, अश्या अभिनेत्रीने 2 चित्रपटामधून कमावले 1300 कोटी

Once Leave in Rented House Childhood Spent Without Toys Today This Actress is National Crush: 'पुष्पा' चित्रपटातील अभिनेत्री रश्मिका मंदाना हिला नॅशनल क्रश म्हणून ओळखले जाते. सौंदर्यासोबतच रश्मिका मंदाना ही तिच्या अभिनयाने देखील प्रेक्षकांच्या मनावर राज्य करते. टॉलीवूडमध्ये प्रसिद्धी मिळवून आता ही अभिनेत्री बॉलिवूडमध्ये धुमाकूळ घालत आहे . बॉलीवूडमध्ये 'गुडबाय' चित्रपटात तिने तिचे पहिले पाऊल ठेवले आणि त्यानंतर तिने 'अॅनिमल' चित्रपटातून सगळ्यांची मने जिंकली. तिचे चित्रपट बॉक्स ऑफिसमध्ये मोठ्या प्रमाणात कमाई करतात. त्यासोबतच हिट देखील ठरतात. रश्मिकाने फक्त 2 चित्रपटातून 1300 कोटींची कमाई केली. ज्यामध्ये 'पुष्पा' चित्रपटाने 400 कोटी तर 'अॅनिमल' चित्रपटाने 900 कोटींची कमाई केली. सिनेसृष्टीत येण्यासाठी अभिनेत्रीने खूप संघर्ष केला. रश्मिकाला लहानपणी अनेक वाईट गोष्टींना समोरे जावे लागले होते. 

असं होतं रश्मिकाचे लहानपण
रश्मिका मंदानाची लहानपणी खूप बिकट परिस्थिती होती. तिच्या आई-वडिलांना बऱ्याच आर्थिक समस्यांना समोरे जावे लागले होते. हिंदुस्तान टाईम्सच्या मुलाखतीत तिनं आपल्या बालपणाबद्दल सर्व सांगितले आहे. घरात आर्थिक परिस्थिती सुरु असताना देखील तिच्या आई-वडिलांनी तिला कधीच कोणत्याही गोष्टींची कमी पडू दिली नाही. मात्र, तिला घरातल्या परिस्थितीची जाण असल्यानं तिने कधीच काही मागितले नाही. तिने असे सांगितले की लहानपणी खेळणी घेण्यासाठी देखील तिच्या आई-वडिलांकडे पैसे नसायचे. 

हे ही वाचा : https://zeenews.india.com/marathi/entertainment/after-bhool-bhuliya-akshay-kumar-lost-singh-is-king-sequel/861015

रश्मिका मंदानाच्या आताच्या आयुष्यात तिने बरेच चित्रपट केले आणि तिचा आगामी चित्रपट म्हणजेच 'पुष्पा2' या चित्रपटात ती अल्लू अर्जुनसोबत दिसणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या आगामी चित्रपटात रश्मिका मंदाना देखील दिसणार आहे. या चित्रपटाचे नाव 'सिकंदर' असणार आहे. लवकरचं आपल्याला सलमान आणि रश्मिकाची जोडी पाहायला मिळेल. 

Read More