Marathi News> मनोरंजन
Advertisement

कधीही रूपेरी पडद्यावर झळकल्या नाहीत 'या' जोड्या

अनेक चित्रपटांच्या माध्यमातून चाहत्यांनी आपल्या लाडक्या कलाकाराला डोक्यावर घेतलं. 

कधीही रूपेरी पडद्यावर झळकल्या नाहीत 'या' जोड्या

मुंबई : बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार आहे ज्यांनी दोन दशकांपेक्षा देखील जास्त काळा मोठा पडदा गाजवला आहे. अनेक चित्रपटांच्या माध्यमातून चाहत्यांनी आपल्या लाडक्या कलाकाराला डोक्यावर घेतलं. याचदरम्यान अनेकांची नावे एकमेकांना जोडली गेली. पण अशा काही जोड्या आहेत ज्यांनी कधीच एकमेकांसोबत स्क्रिन शेअर केली नाही. त्यांपैकी काही खास जोड्या...

आमिर खान आणि श्रीदेवी : श्रीदेवींच्या अभिनयाने चाहत्यांच्या मनात घर केले होते. 'मिस्टर इंडिया', 'इंग्लिश विंग्लिश', 'मॉम' या चित्रपटांनी तर चाहत्यांच्या मनात अधिराज्य गाजवले होते. तर अभिनेता आमिर खानने 'कयामत से कयामत तक', 'लगान', 'तारे जमीन पर' अनेक चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या पण हे दोघे कधीच एकत्र झळकले नाहीत.

सलमान खान आणि जूही चावला : अभिनेत्री जूही चावला आणि सलमान खानने कधीही एकत्र काम नाही. पण तेव्हा ती फार कमालीची अभिनेत्री होती. ९० व्या दशकात जूही प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक होती. सलमान खान सोबत काम करण्याची इच्छा जवळपास सर्वच अभिनेत्रींची असते. 

अक्षय कुमार आणि राणी मुखर्जी : अक्षयला बॉलिवूडचा खिलाडी अभिनेता म्हणून ओळखलं जातं. तर दुसरी कडे रूपेरी पडद्यापासून ब्रेक घतलेली राणी पुन्हा बॉलिवूडमध्ये तिचं राज्य प्रस्थापित करण्यासाठी सज्ज झाली आहे. ही देखील कधीही एकत्र झळकली नाही. 

आमिर खान आणि ऐश्वर्या राय बच्चन : आमिर खान म्हणजे बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट. तर ऐश्वर्याचं सौंदर्य सर्वांना मोहीत करतं. पण या दोघांनी कधीच स्क्रिन शेअर केली नाही. पण त्यांच्या चाहत्यांची संख्या पूर्ण जगभरात मोठ्या प्रमाणात आहेत. 

Read More