Marathi News> मनोरंजन
Advertisement

धक्कादायक : 'या' व्यक्तीने 'इंडियन आयडॉल 13'ची उघडली पोल?

टीव्हीचा सर्वात मोठा सिंगिंग रिएलिटी शो इंडियन आयडल सीझन 13 सध्या वादात आहे.

धक्कादायक : 'या' व्यक्तीने 'इंडियन आयडॉल 13'ची उघडली पोल?

मुंबई : टीव्हीचा सर्वात मोठा सिंगिंग रिएलिटी शो इंडियन आयडल सीझन 13 सध्या वादात आहे. या शोबाबत सोशल मीडियावर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. अरुणाचल प्रदेशातील गायक-संगीतकार रिटो रिबा यांच्या नकाराच्या विरोधात युजर्स शोवर जोरदार टीका करत आहेत. आता एका प्रभावशाली व्यक्तीने सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. ज्यामध्ये इंडियन आयडॉल शोचा पर्दाफाश करण्यात आला आहे. या व्यक्तीने व्हिडिओद्वारे सांगितलं आहे की, इंडियन आयडॉलसारख्या मोठ्या सिंगिंग रिएलिटी शोमध्ये निवड होण्यासाठी काय करावं लागतं?

हा व्हिडिओ व्हायरल होत आहे
इंस्टाग्रामवर जेम्स लिबांग नावाच्या व्यक्तीने इंडियन आयडॉल रिएलिटी शोच्या विरोधात एक मजेदार व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये जेम्स शोमध्ये गाण्याचं ऑडिशन देताना दिसत आहे. आधी तो रिटो-रिबाच्या आवाजात गाणं गाऊन परफॉर्म करतो. त्यानंतर शोचे जज त्याला रिजेक्ट करतात. त्यानंतर, तो अॅक्टिंग करतो की, मी खूप गरीब आहे.  आणि असहायता दाखवतो. यानंतर इंडियन आयडलमध्ये त्याचं सिलेक्शन होतं.

त्याची ही भावनिक कथा ऐकून जजना देखील अश्रू आवरता येत नाहीत. आणि एक हास्यास्पद गाणं गायल्यानंतरही शोचे जज त्यांच्यासाठी उभे राहून टाळ्या वाजवताना दिसतात. हा मजेशीर व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. शो पाहणाऱ्यांना हा व्हिडिओ खूपच आवडला आहे. तसंच कमेंट करून तुमचा अभिप्राय कळवा. नागालँडचे मंत्री टेमजेन इम्ना अलँग यांनी रिटो रिबाला पाठिंबा दिला आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

वास्तविक, जेम्सचा हा व्हिडिओ एडिट करण्यात आला असून इंडियन आयडॉल शोला विनोदी पद्धतीने ट्रोल करण्याच्या उद्देशाने हा व्हिडिओ बनवण्यात आला आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून सोशल मीडिया कंटेंट क्रिएटरने गायक रिटो रिबाला पाठिंबा दिला आहे. हिमेश रेशमिया, नेहा कक्कर आणि विशाल ददलानी यांनी रिटो रिबाला सुवर्ण संधी न देऊन टॉप 15 मध्ये कसं निवडलं नाही हे देखील व्हिडिओमध्ये दिसून आलं आहे.

Read More