Marathi News> मनोरंजन
Advertisement

एकच चित्रपट अन् इंडस्ट्रीला रामराम ठोकणारी शाहरुख खानची ही अभिनेत्री सध्या काय करते?; आज 45000 कोटींची मालकीण

या अभिनेत्रीने बॉलिवूडमध्ये 2004 मध्ये पदार्पण केले.पहिलाच चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरला. मात्र या यशानंतरही अभिनेत्रीने बॉलिवूडला रामराम ठोकला.आज ही अभिनेत्री बॉलिवूडपासून दूर राहूनही कोट्याधिश आहे. तिच्या कडे जवळपास 45000 कोटींची संपत्ती आहे.    

एकच चित्रपट अन् इंडस्ट्रीला रामराम ठोकणारी शाहरुख खानची ही अभिनेत्री सध्या काय करते?; आज 45000 कोटींची मालकीण

Guess This Bollywood Actress: बॉलिवूडमधील या अभिनेत्रीचे नाव आहे गायत्री जोश.गायत्री जोशीने आपल्या करिअरची सुरुवात मॉडेलिंगमधून केली. ती 'फेमिना मिस इंडिया' स्पर्धेत अंतिम फेरीपर्यंत पोहोचली होती. यानंतर तिने अनेक जाहिरातींमधून लोकप्रियता मिळवली आणि अखेर 'स्वदेस' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.

'स्वदेस'मधील भूमिकेचं आजही केलं जातं कौतुक
'स्वदेस'मध्ये गायत्री जोशीने गीता नावाच्या एका आदर्शवादी शिक्षिकेची भूमिका साकारली. या भूमिकेमुळे तिच्या साध्या आणि आत्मीय अभिनयाचं प्रचंड कौतुक झालं. हा चित्रपट आजही शाहरुखच्या सर्वोत्कृष्ट चित्रपटांमध्ये गणला जातो आणि गायत्रीच्या अभिनयाचाही नेहमीच उल्लेख होतो.

एका निर्णयाने अभिनय कारकिर्द संपली
'स्वदेस'च्या यशानंतर अनेक निर्माते-दिग्दर्शकांनी गायत्रीला चित्रपटांसाठी संपर्क केला होता. मात्र तिने ग्लॅमर आणि चकाकीपासून दूर राहून कुटुंब आणि खासगी आयुष्य निवडलं. 2005 मध्ये तिने विकास ओबेरॉयसोबत लग्न केले आणि चित्रपटसृष्टीपासून पूर्णपणे अलिप्त राहणं पसंत केलं.

पती विकास ओबेरॉय आणि त्यांचं साम्राज्य
विकास ओबेरॉय हे भारतातील आघाडीचे रिअल इस्टेट उद्योजक आहेत. ओबेरॉय रिअल्टी या त्यांच्या कंपनीच्या माध्यमातून त्यांनी मुंबईत अनेक प्रकल्प उभारले आहेत. त्यांच्या नेट वर्थचा अंदाज सुमारे 45000 कोटी आहे. विकास केवळ बिझनेसमन नाही, तर त्यांना पायलट परवाना आहे आणि ते स्वतः विमानही उडवतात.

गायत्री जोशीचा आलिशान जीवनशैली
गायत्री आपल्या पतीसोबत मुंबईतील वरळी येथील 360 वेस्ट या 82 मजली इमारतीतील 400 कोटी रुपयांच्या आलिशान पेंटहाऊसमध्ये राहते. त्यांच्या घरातून अरबी समुद्राचं सुंदर दृश्य दिसतं. या घरात सर्व आधुनिक सुखसोयी आहेत.

हे ही वाचा: Raid 2 आता OTT वरही ट्रेडिंग पण शुल्लक चुकीमुळे Troll होतोय रितेश; तुमच्या लक्षात आली का 'ही' चूक?

संपत्ती असूनही साधेपण जपते

प्रचंड संपत्ती असूनही गायत्री जोशी फारशी लाइमलाइटमध्ये दिसत नाही. ती समाजसेवेत सहभागी होते आणि अनेक मुलांसाठी शिक्षण व आरोग्य उपक्रमांमध्ये मदत करते. तिचा सोशल मीडिया अकाउंटही प्रायव्हेट आहे.

कुटुंब आणि मुलांसोबत समाधानी आयुष्य
गायत्री आणि विकासला विहान आणि युवान हे दोन मुलगे आहेत. गायत्री सध्या त्यांचं संगोपन करण्यात आणि कौटुंबिक आयुष्य जगण्यातच आनंद मानते

Read More