Marathi News> मनोरंजन
Advertisement

रणबीर- आलियाच्या नात्याविषयी सोनी राजदान असं काही म्हणाल्या की....

बऱ्याच काळापासून आलिया- रणबीर रिलेशनशिपमध्ये आहेत. 

रणबीर- आलियाच्या नात्याविषयी सोनी राजदान असं काही म्हणाल्या की....

मुंबई : हिंदी कलाविश्वात काही काळापासून एका सेलिब्रिटी जोडीच्या बऱ्याच चर्चा होत आहेत. ती सेलिब्रिटी जोडी म्हणजे आलिया भट्ट आणि रणबीर कपूर. अभिनय विश्वात नावारुपास येत स्वत:ची नवी ओळख प्रस्थापित करणारे आलिया आणि रणबीर बऱ्याच महिन्यांपासून एकमेकांना डेट करत आहेत. सुरुवातीचा काही काळ त्यांनी या नात्याविषयी काही न बोलण्यास प्राधान्य दिलं. पण, त्यानंतर मात्र त्या दोघांनीही अनेक कार्यक्रमांमध्ये किंवा माध्यमांसमोरही त्यांच्या नात्याविषयी खुलेपणाने बोलण्यास सुरुवात केली. 

आलिया आणि रणबीरच्या नात्याची चाहूल ही त्या दोघांच्याही कुटुंबीयांपर्यंत पोहोचली आहे. आलियाच्या आईने म्हणजेच सोनी राजदान यांनी आपल्या मुलीच्या या नात्याविषयी दिलेली प्रतिक्रिया पाहता 'सब है राझी....', असं म्हणायला हरकत नाही. 'बॉलिवूड लाईफ'शी संवाद साधताना त्यांनी मुलीच्या या नात्याविषयी प्रतिक्रिया दिली. 

आलिया- रणबीरच्या नात्याविषयी त्या म्हणाल्या, 'हे तिचं (आलियाचं) खासगी आयुष्य आहे. त्यातही रणबीर हा अत्यंत चांगला मुलगा आहे. आतापर्यंत आलियाने ज्या कोणाला डेट केलं ती तिची स्वत:ची निवड होती. मी तिला प्रत्येक पावलावर साथ देईन. पण, यावेळी त्यांच्या या नात्याविषयी बोलणं योग्य नाही.' मुलीच्या खासगी आयुष्यावर जाहीरपणे काहीही वक्तव्य करणं योग्य नसल्याचं म्हणत तिच्या आनंदातच आपलाही आनंद असल्याची बाब त्यांनी मांडली. 

आलियाच्या आईची ही प्रतिक्रिया आणि सोशल मीडियावर रणबीरच्या कुटुंबीयांशी होणारा त्यांचा संवाद, या सर्व गोष्टी पाहता दोघांच्या कुटुंबांमध्येही एक सुरेख नातं आकारास आल्याचं पाहायला मिळत आहे. सध्याच्या घडीला एकिकडे आलिया आणि रणबीरच्या साखरपुड्याच्या चर्चांनी जोर धरलेला असताना ते दोघं मात्र आगामी चित्रपटावर लक्ष केंद्रीत करत आहेत. अयान मुखर्जी दिग्दर्शित 'ब्रह्मास्त्र' या चित्रपटातून आलिया आणि रणबीर झळकणार आहेत. त्यामुळे या जोडीची ऑनस्क्रीन केमिस्ट्री पाहण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे. या चित्रपटात बहुचर्चित सेलिब्रिटी जोडीशिवाय अभिनेते अमिताभ बच्चनही झळकणार आहेत. 

Read More