Marathi News> मनोरंजन
Advertisement

रक्त येत होतं, पण ऐश्वर्या थांबली नाही.... नक्की शुट दरम्यान असं काय घडलं?

 आपल्या सैंदर्य आणि अभिनयाने लोकांना भुरळ पाडलेल्या अभिनेत्री ऐश्वर्या रायने आपल्या काळात अनेक हीट चित्रपट दिले आहे. 

रक्त येत होतं, पण ऐश्वर्या थांबली नाही.... नक्की शुट दरम्यान असं काय घडलं?

मुंबई : आपल्या सैंदर्य आणि अभिनयाने लोकांना भुरळ पाडलेल्या अभिनेत्री ऐश्वर्या रायने आपल्या काळात अनेक हीट चित्रपट दिले आहे. शिवाय ऐश्वर्याने अनेक जाहीराती देखील केल्या आहेत. मिस वर्ल्ड झाल्यानंतर ऐश्वर्याने सिनेसृष्टीत आपलं नशीब आजमावलं आणि तिथे ती हीट देखील ठरली, ज्यानंतर ऐश्वर्याने कधीही मागे वळून पाहिलं नाही. ज्यानंतर ऐश्वर्याने अभिनेता अभिषेक बच्चरसोबत लग्न केलं आणि सिनेमांपासून लांब राहू लागली. परंतु असं असलं तरी, ऐश्वर्याच्या चाहत्यांनी आजही कमी नाही. ते अजूनही ऐश्वर्याला फॉलो करतात.

आपण ऐश्वर्याची कारकिर्द पाहिलं आहे. परंतु तिने आपलं नाव कमावण्यासाठी केलेली मेहनत फारच कमी लोकांना माहित असेल. आज आम्ही तुम्हाला ऐश्वर्याची मेहनत आणि समर्पणाशी संबंधित एक किस्सा सांगणार आहोत, जो जाणून घेतल्यावर तुम्हाला आश्चर्य वाटेल.

हा किस्सा 2002 सालचा आहे, जेव्हा शाहरुख खानचा देवदास रिलीज झाला होता. ऐश्वर्या राय आणि माधुरी दीक्षित देखील या चित्रपटाचा महत्त्वाचा भाग होत्या. हा संपूर्ण चित्रपट ऐतिहासिक असला तरी या चित्रपटातील डोला रे डोला हे गाणे खूप चर्चेत होते. ज्याचा अजूनही वेगळा फॅनबेस आहे.

या गाण्यावर डान्स करण्यासाठी ऐश्वर्या आणि माधूरी दोघींनीही खूप मेहनक घेतली. भरलेली आणि जड साडी, शिवाय भरजड दागिनेही यांना परिधान करुन त्यांना हा डान्स करायचा होता. परंतु यादरम्यान अचानक ऐश्वर्याच्या कानाकून रक्त वाहू लागले.

fallbacks

खरंतर जड कानातल्यांमुळे ऐश्वर्याच्या कानातून रक्त वाहू लागलं होतं. पण तरीही ऐशने हे कोणालाही सांगितले नाही आणि शूटिंग सुरूच ठेवले. गाणे पूर्ण झाल्यावर त्याने ही गोष्ट क्रूला सांगितली आणि त्याच्यावर उपचार करण्यात आले.

आपल्याला हे गाणं पाहिल्यानंतर एकदाही हे जाणवणार नाही की, खरंच ऐश्वर्यासोबत एवढी मोठी गोष्ट घडली होती.

Read More