मुंबई : आमिर खानचा आगामी मल्टी स्टारर सिनेमा 'ठग्स ऑफ हिंदुस्तान' या सिनेमाचा लोगो मेकर्सने शेअर केला आहे. इंटरनेटवर हा व्हिडिओ खूप पसंतीला पडत आहे. आमिरने देखील आपल्या ऑफिशिर ट्विटर अकाऊंटवर याचा लोगो व्हिडिओ ट्विट केला आहे. आपल्या ट्विटवर आमिरने लिहिलं आहे की, 'ठग्स' येत आहे. आमिर खानचा हा सिनेमा यशराज फिल्मच्या बॅनरखाली या सिनेमाची निर्मिती होत आहे. इंटरनेटवर रिलीज केलेला हा व्हिडिओ हे स्पष्ट करतोय की, ठग्स ऑफ हिंदुस्तान हा सिनेमा अॅक्शन सिनेमा आहे.
The thugs are coming.
— Aamir Khan (@aamir_khan) September 17, 2018
love,
a.
#ThugsOfHindostan releasing on 8th November.@yrf | @TOHTheFilm | @SrBachchan | @fattysanashaikh | #KatrinaKaifhttps://t.co/kczxjmvtWQ
या सिनेमाची खास गोष्ट ही आहे की, आमिर खान पहिल्यांदा बिग बी अमिताभ बच्चन यांच्यासोबत दिसणार आहे. त्याप्रमाणेच या सिनेमांत कतरिना कैफ आणि फातिमा सना शेख दिसणार आहे. या सिनेमाची गेले कित्येक दिवस शुटिंग सुरू आहे. माल्टा येथे सिनेमाच शुटिंग झालं. त्याचप्रमाणे राजस्थानच्या जोधपुरच्या मेहरानगड किल्यात शुटिंग झाली आहे.
या सिनेमाबाबत प्रेक्षकांना भरपूर उत्सुकता आहे. यावर्षाचा सर्वात मोठा सिनेमा असल्याचं म्हटलं जात आहे. काही दिवसांपूर्वी आमिर आणि अमिताभ यांचा सेटवरील लूक व्हायरल झाला होता. त्यामुळे चाहत्यांमध्ये आणखी उत्सुकता वाढली आहे.