Marathi News> मनोरंजन
Advertisement

टायगर-दिशानं ब्रेकअपच्या चर्चांना असा दिला पूर्णविराम

गुरूवारी रात्री टायगर आणि दिशा हे दोघे एकत्र मीडियाच्या कॅमेऱ्यामध्ये कैद झाले आहेत.

टायगर-दिशानं ब्रेकअपच्या चर्चांना असा दिला पूर्णविराम

मुंबई : अभिनेता टायगर श्रॉफ आणि अभिनेत्री दिशा पटनी गेल्या काही दिवसांपासून चांगलेच चर्चेत आहेत. त्यांच्या ब्रेकअपच्या चर्चांनी त्यांचे चाहत्यांनाही खूप धक्का बसला. पण या दोघांच्या नुकत्याच व्हायरल झालेल्या फोटोंनी या चर्चांना पूर्ण विराम दिले आहे. गुरूवारी रात्री टायगर आणि दिशा हे दोघे एकत्र मीडियाच्या कॅमेऱ्यामध्ये कैद झाले आहेत. गेल्या तीन वर्षांपासून हे दोघे एकमेकांना डेट करत आहेत. टायगर-दिशा या प्रेमी युगुलांना अनेक वेळा हॉटेल्स बाहेर, पार्ट्यामध्ये स्पॉट करण्यात आले. त्यामुळे या दोघांत काही बिनसलं नसल्याचंच दिसून येतंय. 

fallbacks

टायगर- दिशाच्या ब्रेकअपमुळे त्यांच्या चाहत्यांमध्ये चांगलीच चर्चा रंगत होती. त्यांच्या ब्रेकअपच्या चर्चांमुळे चाहत्यांचा हिरमोड झाल्याचे समोर येत होते. पण गुरूवारी त्यांचा एकत्र असलेला फोटो पाहिल्यानंतर चाहत्यांना फारच आनंद झाला आहे.

 

fallbacks

 

'बागी २' चित्रपटात हे दोघे एकत्र झळकले होते. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी केली होती. दिशा सध्या तिचा आगामी 'मंगल' चित्रपटाच्या चित्रिकरणामध्ये व्यस्त आहे. चित्रपटात दिशा व्यतिरिक्त अभिनेता अनील कपूर आणि आदित्य रॉय कपूर झळकणार आहेत.

त्याचप्रमाणे टायगर त्याच्या 'बागी ३ ' चित्रपटामध्ये व्यस्त आहे. 'बागी ३' मध्ये टायगरसोबत अभिनेता ह्रतिक रोशन सुद्धा झळकणार आहे.

Read More