Marathi News> मनोरंजन
Advertisement

Box Office वर 'टाइगर जिंदा है'चा धमाका, पहिल्या दिवशी केली इतकी कमाई

बॉलिवूडचा ‘दबंग’ सलमान खान याचा ‘टायगर जिंदा है’ सिनेमा या शुक्रवारी रिलीज झालाय. अनेक दिवसांपासून या सिनेमाची सलमानचे फॅन आतुरतेने वाट पाहत होते.

Box Office वर 'टाइगर जिंदा है'चा धमाका, पहिल्या दिवशी केली इतकी कमाई

मुंबई : बॉलिवूडचा ‘दबंग’ सलमान खान याचा ‘टायगर जिंदा है’ सिनेमा या शुक्रवारी रिलीज झालाय. अनेक दिवसांपासून या सिनेमाची सलमानचे फॅन आतुरतेने वाट पाहत होते. कारण या सिनेमातून ब-याच वर्षांनी सलमान आणि कतरिना एकत्र बघायला मिळणार होते. आता सिनेमाला प्रेक्षकांचा जोरदार प्रतिसाद मिळत आहे. 

पहिल्या दिवसाची कमाई

समीक्षकांनुसार हा सिनेमा प्रेक्षकांच्या अपेक्षांवर खरा उतरला आहे. ‘ट्यूबलाईट’च्या अपयशानंतर सलमान खानने या सिनेमातून धमाकेदार एन्ट्री केली आहे. या सिनेमाने पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर धमाका केलाय. सिनेमाने पहिल्याच दिवशी साधारण ३४ कोटी रूपयांची कमाई करत सर्वांनाच आश्चर्यात टाकले. बॉक्स ऑफिस इंडियानुसार या सिनेमाने पहिल्या दिवशी ३४ कोटी रूपयांचा गल्ला जमवलाय. 

मनोरंजनाचा मसाला

‘टायगर जिंदा है’ हा सिनेमात सलमान आणि कतरिना या जोडीसोबतच खूप काही आकर्षक आहे. या सिनेमात धमाकेदार अ‍ॅक्शन, जबरदस्त लोकेशन्स आहेत. मोरक्को, ग्रीससारख्या सुंदर जागांवर या सिनेमाचं शूट करण्यात आलंय. त्यासोबतच सलमान आणि कतरिनाचा रोमान्सही सर्वांना आनंद देत आहे.

Read More