Marathi News> मनोरंजन
Advertisement

बहिणीच्या बिकनी फोटोंवर टायगरची प्रतिक्रिया

कृष्णाच्या प्रियकराला म्हणाला...    

बहिणीच्या बिकनी फोटोंवर टायगरची प्रतिक्रिया

मुंबई : अनेक मुलींच्या गळ्यातील ताईद असलेला अभिनेता टायगर श्रॉफच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. त्याचबरोबर त्याची बहिण कृष्णा श्रॉफच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे . कृष्णा अभिनय क्षेत्रात सक्रिय नसली तरी ती तिच्या प्रेमप्रकरणामुळे चांगलीच चर्चेत असते. ती नेहमी तिच्या बॉयफ्रेंडसोबत फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.

आता सुद्धा तिने प्रियकरासोबत इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. तिच्या या फोटोवर चाहत्यांनी संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. पण भाऊ टायगरला तिचा हा अंदाज पटला नसल्याचं दिसून येत आहे. कृष्णा एबनला डेट करत असून बऱ्याच वर्षांपासून ते एकमेकांना ओळखतात. शिवाय एबन आणि टायगर दोघे मित्र आहेत. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Always making me laugh.Grateful to have met my best friend, twin soul, and love this year. @ebanhyams

A post shared by Krishna Jackie Shroff (@kishushroff) on

कृष्णाच्या फोटोवर वाकडं तोंड करून 'एबन गरीब' असं कमेंट केलं आहे. सध्या कृष्णाचे तिच्या प्रियकरासोबत असलेले फोटो मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत. ती कायम सोशल मीडियावर सक्रिय असते.  

fallbacks

समुद्र किनारी ती बॉयफ्रेंड एबन हायम्स फिरत असल्याचे दिसत आहे. या फोटोंमध्ये ती बिकनीमध्ये दिसत आहे. दोघांचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. कृष्णा सोशल मीडियावर कायम सक्रीय असते. ती सतत दोघांचे फोटो स्वत: इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर करत असते. 

काही दिवसांपूर्वी टायगर-कृष्णाने फोटोशूट केले होते. कृष्णा अभिनेत्री नसली तरी ती एखाद्या अभिनेत्रीपेक्षा कमी ग्लॅमरस देखील नाही. ती देखील टायगर प्रमाणे फिटनेस बद्दल जागृत आहे. तिच्या प्रत्येक घडामोडींकडे तिच्या चाहत्यांचे विशेष लक्ष असते.

Read More