Marathi News> मनोरंजन
Advertisement

टायगर जिंदा है चित्रपटाचे अ‍ॅडव्हान्स बुकिंग उद्यापासून होणार सुरू

सलमान खान आणि कॅटरिना कैफ यांच्यातील रोमांस आणि अ‍ॅक्शन पाहण्यासाठी त्यांचे चाहते उत्सुक आहेत. 

टायगर जिंदा है चित्रपटाचे अ‍ॅडव्हान्स बुकिंग उद्यापासून होणार सुरू

मुंबई : सलमान खान आणि कॅटरिना कैफ यांच्यातील रोमांस आणि अ‍ॅक्शन पाहण्यासाठी त्यांचे चाहते उत्सुक आहेत. 

येत्या २२ डिसेंबरला 'टायगर जिंदा है' चित्रपट रसिकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाने यूए सर्टिफिकेट दिले आहे. 

ट्रेलर, गाण्याची धूम  

'टायगर जिंदा है' चित्रपटातील दोन्ही गाण्यांना सोबतच ट्रेलरला रेकॉर्डब्रेक व्ह्युज मिळाले आहेत. त्यावरूनच हा चित्रपट बॉक्सऑफिसवर दमदार कामगिरी करणार असल्याचे अंदाज वर्तवण्यात आले आहेत.  

 

कधी सुरू होणार अ‍ॅडव्हान्स बुकिंग 

'टायगर जिंदा है' चित्रपट हा येत्या शुक्रवारी म्हणजेच २२ डिसेंबरला रीलिज होणार आहे. तर चित्रपटाचे अ‍ॅडव्हान्स बुकिंग रविवार १७ डिसेंबरपासून सुरू होणार आहे. सोबतच ऑनलाईन बुकिंगही खुले होणार आहे. 

Read More