Marathi News> मनोरंजन
Advertisement

'तो माझ्या जवळ आला आणि...', 'तारक मेहता'तील अभिनेत्रीने सांगितला हादरवून टाकणार अनुभव

TMKOC Actress: मलाही माझ्या मॉडेलिंगच्या दिवसांमध्ये कास्टिंग काउचला सामोरे जावे लागले होते. त्यानंतर मी इतकी घाबरली होती की मला माझ्या वडिलांसमोर जाण्याचीही भीती वाटू लागली होती, असे  तारक मेहताच्या दीप्ती म्हणजेच आराधना शर्मा हिने सांगितले.

'तो माझ्या जवळ आला आणि...', 'तारक मेहता'तील अभिनेत्रीने सांगितला हादरवून टाकणार अनुभव

TMKOC Actress: टेलिव्हिजन आणि सिनेक्षेत्रातील अनेक अभिनेत्री त्यांना आलेल्या कास्टिंग काऊचचे अनुभव सोशल मीडियात शेअर करताना दिसतात. तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेत दीप्तीची भूमिका साकारून घराघरात प्रसिद्ध झालेली अभिनेत्री आराधना शर्माने देखील धक्कादायक अनुभव शेअर केला आहे. तिच्या एका जुन्या मुलाखतीमुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. 

आराधना शर्मा ही तारक मेहतामध्ये दीप्ती नावाची गुप्तहेर बनलेली आपण पाहिली असेल. तिने काही वर्षांपूर्वी एका मुलाखतीत कास्टिंग काउचचे गडद सत्य उघड केले. मी देखील कास्टिंग काऊचची बळी ठरली आहे, असे तिने सांगितले.

मलाही माझ्या मॉडेलिंगच्या दिवसांमध्ये कास्टिंग काउचला सामोरे जावे लागले होते. त्यानंतर मी इतकी घाबरली होती की मला माझ्या वडिलांसमोर जाण्याचीही भीती वाटू लागली होती, असे  तारक मेहताच्या दीप्ती म्हणजेच आराधना शर्मा हिने सांगितले.

वडिलांसोबतही झाली अस्वस्थ!

आराधना शर्माने एका मुलाखतीत कास्टिंग काउचवर तिची वेदनादायक कहाणी शेअर केली होती. कास्टिंग एजंटपैकी एकजण तिच्यासोबत अतिशय उद्धटपणे वागला. त्याच्या अचानक अशा वागण्याचा अनुराधाला मोठा धक्का बसला. त्यानंतर ती पूर्णपणे तुटली. ती इतकी घाबरली होती की बराच वेळ ती घाबरली होती. ती तिच्या वडिलांसोबतही अस्वस्थ झाली होती. आराधना मुंबईत शिक्षण घेत असताना एक व्यक्ति कास्टिंग करत होती. त्यावेळी हा अनुभव आला.

धक्कादायक कहाणी 

ती व्यक्ती त्या काळात एका भूमिकेसाठी कास्ट करत होती. आणि आराधना त्याला फक्त भूमिकेसाठी त्याला भेटायला गेली होती.  तेव्हा मी एका खोलीत बसून स्क्रिप्ट वाचत होते, त्यादरम्यान त्या व्यक्तीने तिला वारंवार स्पर्श करण्याचा प्रयत्न केल्याचे आराधनाने सांगितले.

हा प्रकार सुरु असताना सुरुवातील तिला काहीच समजले नाही. पण तिला याचा जोरदार धक्का बसला. तेव्हा ती तिथून उठली आणि बाहेर पळाली, असे तिने कास्टिंग काउचवरचा तिचा वेदनादायक अनुभव शेअर करताना सांगितले.

यानंतर अनेक दिवस आपण याविषयी कोणाशीही बोलू शकलो नाही, असेही तिने पुढे सांगितले.  

आराधना शर्माने तारक मेहता का उल्टा चष्मा व्यतिरिक्त स्प्लिट्सविला 12 आणि अलादीमध्ये काम केले आहे.

Read More