Marathi News> मनोरंजन
Advertisement

आमीर खानच्या आगामी सिनेमा ही अभिनेत्री दिसणार?

वाचा सविस्तर 

आमीर खानच्या आगामी सिनेमा ही अभिनेत्री दिसणार?

मुंबई : मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर खानसोबत काम करणं हे प्रत्येक कलाकाराचं स्वप्न असतं. अशातच आमिर खानच्या आगामी प्रोजेक्टकरता अनेक कलाकार भेटताना दिसत आहेत. मंगळवारी खूप उशिरापर्यंत एक अभिनेत्री आमीरच्या घरात होती. ज्यावरून असा अंदाज लावण्यात येत आहे की, ही कलाकार आमीरच्या आगामी सिनेमात दिसणार आहे. 

fallbacks

पद्मावत सिनेमात रणवीर सिंहची पत्नी असलेली अभिनेत्री अदिती राव हैदरी आपल्या आगामी सिनेमाच्या तयारीत आहे. मुंबईत आमीरच्या रात्री खूप उशिरा अदिती पोहोचली होती. जवळपास 2 ते 3 तास चाललेली यांची मिटींग वेगळेच संकेत देत आहे. 

B'day Special : शाही खानदान की वारिस हैं खूबसूरत अभिनेत्री अदिति राव हैदरी

सुत्रांच्या माहितीनुसार, आमीर आपल्या आगामी सिनेमाच्या कास्टिंगमध्ये व्यस्त आहे. आमीर खानचा बहुचर्चित सिनेमा 'ठग्स ऑफ हिंदुस्तान' रिलीज झाला आहे. प्रेक्षकांकडून या सिनेमाला कमी प्रतिसाद मिळाला आहे. आमीर खानचे आगामी प्रोजेक्ट मुगल, ओशोवरील बायोपिक, राकेश शर्मा यांच्यावर आधारित बायोपिक आणि महाभारत सारखे प्रोजेक्ट आहेत. त्यामुळे आता अदिती राव कोणत्या सिनेमाकरता आली याची अद्याप माहिती नाही. 

Read More