Marathi News> मनोरंजन
Advertisement

Dilip Joshi : ‘तारक मेहता’मधील जेठालाल यांचा छंद, उत्पन्न माहितीय...घामाने चष्मा पुसाल

मालिकेमधील एक विनोदी व्यक्तीमत्व म्हणजे जेठालाल...  

Dilip Joshi : ‘तारक मेहता’मधील जेठालाल यांचा छंद, उत्पन्न माहितीय...घामाने चष्मा पुसाल

मुंबई : 'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिकेने चाहत्यांच्या मनात घर केलं आहे. ही मालिका टप्पूसेनेमुळे लहान मुलांना तर गोकुळ धाम सोसायटीतील एकीमुळे मोठयांना आवडते. दयाबेन, जेठालाल, टप्पू, बापूजी, पोपटलाल आणि शोच्या अन्य कलाकार सर्वांच्या कुटुंबाचा एक भाग झाले आहेत. मालिकेमधील एक विनोदी व्यक्तीमत्व म्हणजे जेठालाल म्हणजे अभिनेते दिलीप जोशी (Dilip Joshi) यांचं. दिलीप जोशी यांनी फार कमी वयात अभिनय करण्यास सुरूवात केली. 

पण 'तारक मेहता का  उल्टा चष्मा' या मालिकेने त्यांना एक वेगळी ओळख दिली. त्यांनी 'मैंने प्यार किया' चित्रपटाच्या माध्यमातून त्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर त्यांनी 'हम आपके है कौन', 'खिलाड़ी 420', 'हमराज', 'फिर भी दिल है हिंदुस्तानी' यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केलं. दिलीप यांनी अनेक प्रसिद्ध मालिकांमध्ये देखील  काम केलं.

पण 'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिकेमुळे मला एक नवी ओळख मिळाली असं त्यांनी एक मुलाखतीत म्हटलं आहे. 'मनोरंजन विश्वात अनेक वर्ष काम केल्यानंतरही तब्बल 1 वर्ष माझ्याकडे काहीचं काम नव्हतं. पण  'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिकेमुळे माझं नशिबचं बदललं. '  सांगायचं झालं तर दिलीप जोशी यांनी जेठालाला या पात्रासाठी एका एपिसोडसाठी 1.5लाख रूपये स्वीकारतात. 

मिळालेल्या माहितीनुसार ते एका महिन्यात 36 लाख रूपये कमवतात. महत्त्वाचं म्हणजे ते महिन्याचे 25 दिवस काम करतात आणि उरलेले दिवस कुटुंबासोबत व्यतीत करतात. दिलीप जोशी यांना लग्जरी गाड्यांमध्ये अत्यंत रस आहे. त्यांच्याकडे ऑडी क्यू 7 आणि इनोवा कार आहे. 

Read More