Marathi News> मनोरंजन
Advertisement

विराटचे चुकून Like अन् आता थेट टॉम क्रुजचा मदतीचा हात! भारतीय अभिनेत्रीला ड्रेस संभाळता येत नसल्याने टॉमने...

Tom Cruise And Avneet Kaur : टॉम क्रुझनं कशी मदत केली त्याविषयी अवनीत कौरनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत सांगितली आहे. 

विराटचे चुकून Like अन् आता थेट टॉम क्रुजचा मदतीचा हात! भारतीय अभिनेत्रीला ड्रेस संभाळता येत नसल्याने टॉमने...

Tom Cruise And Avneet Kaur : सोशल मीडिया सेलिब्रिटी आणि अभिनेत्री अवनीत कौर ही काही दिवसांपूर्वी विराट कोहलीनं तिच्या फॅन पेजच्या एका फोटोला लाईक केलं यामुळे ती चर्चेत आली होती. सध्या तिचं चर्चेत येण्याचं कारण 'मिशन इम्पॉसिबल' स्टार टॉम क्रूज आहे. टॉम क्रूजसोबत अवनीतनं काही फोटो शेअर केले आहेत. त्यात तिनं सांगितलं की गवतावर तिला चालायला होत नव्हतं तर टॉम क्रूजनं तिला मदत केली आहे. लंडनमध्ये बहुप्रतिक्षीत 'मिशन: इम्पॉसिबल - द फाइनल रेकनिंग' चा प्रीमियर होता. त्याचे अनेक फोटो हे अवनीतनं शेअर केले आहेत. 

अलनीतनं शुक्रवारी तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हे फोटो शेअर केले आहेत. हॉलिवूड आयकॉन टॉम क्रूजसोबत तिनं फोटो शेअर केले आहेत. पहिल्या स्टोरीमध्ये अवनीतनं प्रीमियरला आलेल्या पापाराझींसाठी पोज दिल्या. त्यानंतर तिनं एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत अवनीतनं कॅप्शन दिलं की 'आज लंडनमध्ये मिशन इम्पॉसिबलच्या प्रीमियरसाठी आले.'

fallbacks

त्यानंतर पुढच्या पोस्टमध्ये अवनीत कौरनं टॉप क्रूजसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. त्यात तिनं टॉम क्रूजला ट्रू जेंटलमॅन म्हटलं आहे. हा फोटो शेअर करत तिनं लिहिलं की 'टॉम क्रूज सगळ्यात प्रेमळ आणि खूप विनम्र आहे. त्यानं मला गवतावर चालायला मदत केली कारण मला त्या ड्रेसमुळे गवतावर चालायला अडचणी येत होत्या. तुम्ही खरे जेंटलमॅन आहे.'

fallbacks

पुढे तिनं हे देखील लिहिलं की टॉम प्रत्येकवेळी जेव्हा केव्हा मला तुम्हाला भेटण्याची संधी मिळाली आहे. तेव्हा प्रत्येकवेळी मी काहीतरी शिकले. तुम्ही जसे आहात त्यासाठी धन्यवाद. दरम्यान, या आधी जन्नत जुबैर देखील टॉम क्रुजला भेटली होती. तिनं टॉम क्रुजसोबत एक सेल्फी देखील शेअर केला होता. तिनं टॉम क्रुजसोबत फोटो शेअर करत लिहिलं की 'टॉम क्रुजसोबत एक सेल्फी म्हणजेच आयुष्यभर बढाई मारण्याची संधी.'

हेही वाचा : 'मी स्विफ्टमधून आल्याने थांबवलं...'; बॉलिवूडवर कल्की म्हणाली, 'काहीजण 1BHK मध्ये राहतात आणि ऑडी घेऊन फिरतात'

दरम्यान, भारतीय चाहत्यांना हा चित्रपट आज म्हणजे 17 मे रोजी पाहायला मिळणार आहे. तर जगभरात हा चित्रपट 23 मे रोजी प्रदर्शित होणार आहे. याचाच अर्थ हा चित्रपट भारतीयांना 6 दिवस आधी पाहता येणार आहे. 

Read More