Marathi News> मनोरंजन
Advertisement

'स्वराज्यरक्षक संभाजी' फेम अश्विनी महांगडेला पाहून नेटकरी नेटकरी म्हणतात, 'परम सुंदरी'

चर्चेस निमित्त ठरतंय ते म्हणजे तिनं केलेलं फोटोशूट

'स्वराज्यरक्षक संभाजी' फेम अश्विनी महांगडेला पाहून नेटकरी नेटकरी म्हणतात, 'परम सुंदरी'

मुंबई : 'स्वराज्यरक्षक संभाजी' ही मालिका त्यामधी पात्रांनी खऱ्या अर्थानं जीवंत केली. मध्यवर्ती भूमिकेत असणाऱ्या कलाकारांपासून सहाय्यक भूमिकेत असणाऱ्यांनीही त्यांच्या वाट्याला आलेल्या पात्राला न्याय दिला. यातच गाजलेला एक चेहरा म्हणजे अभिनेत्री अश्विनी महांगडे हिचा. 

राणू आक्का ही भूमिका जगलेल्या आणि या भूमिकेचा प्रचंड अभिमान असणाऱ्या अश्विनीला या मालिकेमुळे जनसामान्यांमध्ये स्थान मिळालं. प्रेक्षकांच्या मनावर तिनं कलेच्या माध्यमातून छाप सोडली. हा प्रभाव इतका होता, की अनेकांनीच तिला अश्विनी ऐवजी राणू आक्का याच नावानं मोठ्या आपुलकीनं हाक मारण्यास सुरुवात केली. 

fallbacks

शब्दांतही मांडता येणार नाही अशा धाडसी प्रवृत्तीचं दर्शन अश्विनीनं साकारेल्या राणू आक्कांना पाहताना होत होतं. आता पुन्हा एकदा अश्विनी अशाच एका कारणामुळे नेटकऱ्यांचं लक्ष वेधतेय. निमित्त ठरतंय ते म्हणजे तिनं केलेलं फोटोशूट. अश्विनीचं पारंपरिक लूक, चापूनचोपून नेसलेली भरजरी साडी, विविध आभुषणांचा साज आणि नजरही हटणार नाही असा श्रृंगार असंच एकंदर रुप पाहून नेटकरी घायाळ होत आहेत. 

fallbacks

खुद्द अश्विनीनं सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या या फोटोशूटचे फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये गतकाळातील कोणी सुंदरीच आपल्यासमोर अवतरत असल्याचा भास होतो आहे. साधेपणातच खरं सौंदर्य आहे, अशा आशयाचं कॅप्शन तिनं आपल्या फोटोंना दिलं आहे. तर, परम सुंदरी असं एक गाणंही तिनं यापैकीच एका पोस्टला जोडलंही आहे. अश्विनीनं जोडलेलं हे गाणं आणि तिचा लूक पाहता ती खरंच इथं 'परम सुंदरी' दिसतेय यात वाद नाही, अशा उत्स्फूर्त प्रतिक्रिया फॉलोअर्सनी दिल्या आहेत. 

Read More