Marathi News> मनोरंजन
Advertisement

चर्चा तर होणारच! कतरिना कैफने केलं विजय सेतुपतीला किस? काय आहे नेमकं प्रकरण

कतरिना कैफ आणि विजय सेतुपतिचा 'मेरी ख्रिसमस' या सिनेमाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. नुकताच या सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. श्रीराम राघवन दिग्दर्शित या सिनेमाचा ट्रेलर सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. 

चर्चा तर होणारच! कतरिना कैफने केलं विजय सेतुपतीला किस? काय आहे नेमकं प्रकरण

मुंबई : कतरिना कैफ आणि विजय सेतुपतिचा 'मेरी ख्रिसमस' या सिनेमाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. नुकताच या सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. श्रीराम राघवन दिग्दर्शित या सिनेमाचा ट्रेलर सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या सिनेमाचा ट्रेलर सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. खरंतर युजर्सचं असं म्हणणं आहे की, या चित्रपटाचा ट्रेलर पाहून अंधाधुन' आणि 'बदलापूर' सिनेमांप्रमाणेच अनुभव येतो. 'मेरी क्रिसमस'चा ट्रेलमधील ओपनिंग सीनच डोक्यात अनेक प्रश्न निर्माण करतो आणि या सिनेमात थ्रिल आणि सस्पेन्स किती टोकाला जातो हेही दाखवण्यात आलं आहे. 

कसा आहे सिनेमाचा ट्रेलर 
एका व्यक्तीसोबत एका छोट्या मुलची सावली दिसते. कदाचित तो माणूस त्या मुलीला सांगतोय की, जेव्हापासून ही दुनिया बनली आहे ना! तेव्हापासून आम्ही सगळे एका क्षणाच्या शोधात आहोत आणि जेव्हा तो  क्षण येतो तेव्हा समजून येतं की शेकडो वर्षापासून चालत आलेलं आयुष्य हे एका क्षणासाठी होती. यानंतर सीन कट होतो आणि कतरिना आणि विजय सेतुपतीचा सीन सुरु होतो. दोघं भेटतात आणि तीन तास एकमेकांसोबत खूप सुंदर वेळ घालवतात. पण या तीन तासात विजय सेतुपती आणि कतरिनाचं आयुष्य कसं बदलतं आणि काय काय भयंकर होतं हे पाहून तुमच्या भुवया उंचावतील.

मेरी ख्रिसमसच्या ट्रेलरमध्ये राजेश खन्नाचा सीन देखील आहे.  कतरिना कैफ विजय सेतुपतीला दोन बोटं दाखवते आणि त्यातील एक बोट निवडण्यास सांगते. जेव्हा विजय एका बोटाची निवड करतो तेव्हा कतरिना  तिच्याकडे असलेल्या माचिसचे कार्ड फिरवते, ज्यावर राजेश खन्ना यांचा फोटो छापलेला असतो.  त्यावर 'द नाईट इज डार्केस्ट बिफोर द डॉन' असं लिहिलं आहे. आता त्याचा संदर्भ काय आहे?
हे आपल्याला सिनेमा आल्यावरच समजेल.

कोणी दिला कोणाला धोका? काय आहे ट्वीस्ट? 
आता कोणी कोणासोबत वाईट केलं आहे आणि कोणाला धोका मिळाला आहे दोषी कोण? कतरिना की विजय सेतुपती की आणखी कोणी?  हे ट्रेलर पाहून अंदाज लावणं कठिण आहे. जर तुम्ही बदलापूर आणि अंधाधुन पाहिला असेल तर आपण समजाल की  श्रीराम राघवन आपल्या नविन सिनेमात मेरी ख्रिसमस किती थ्रिलर बनवला असेल. ट्रेलरमध्ये कतरिना आणि विजय सेतुपतिमध्ये एक किसींग सीन देखील आहे. जो तेव्हाचा आहे जेव्हा रात्री १२ वाजतात. ख्रिसमस सेलिब्रेट करतात.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

हा एक थ्रिलर चित्रपट आहे, ज्यामध्ये येणारे ट्विस्ट आणि सस्पेंस तुमच्या भुवया उंचावतील. हा सिनेमा 12 जानेवारी 2024मध्ये रिलीज होईल. या सिनेमातून कतरिना कैफ आणि दिग्दर्शक श्रीराम राघवन तामिळ सिनेमात डेब्यू करत आहे. तर विजय सेतुपतिचा हा तिसरा हिंदी सिनेमा आहे. याआधी तो 'फर्जी' आणि 'जवान'मध्ये दिसला आहे. 'मेरी ख्रिसमस'मध्ये कतरिना कैफ आणि विजय सेतुपतिशिवाय संजय कपूर, विनय पाठक आणि राधिका सरतकुमारसोबत अनेक सेलिब्रिटी मुख्य भूमिकेत आहे.

Read More