Marathi News> मनोरंजन
Advertisement

Animal मधील न्यूड सीनवरून ट्रोल होणाऱ्या तृप्ती डिमरीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाली, 'मी खूप...'

Triptii Dimri : तृप्ती डिमरीला रणबीर कपूरसोबत दिलेल्या न्यूड सीनवरून सोशल मीडियावर ट्र्रोल करण्यात आलं. त्यावर आता तृप्तीनं प्रतिक्रिया दिली आहे. 

Animal मधील न्यूड सीनवरून ट्रोल होणाऱ्या तृप्ती डिमरीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाली, 'मी खूप...'

Triptii Dimri : बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर हा त्याच्या 'ॲनिमल' चित्रपटामुळे चर्चेत आहे. त्याच्या या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली. चित्रपटाला मिळालेलं यश पाहता निर्मात्यांना खूप आनंद झाला आहे. या चित्रपटात रश्मिका मंदाना आणि तृप्ती डिमरीसोबक अनेक कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. पण सध्या चर्चेत तृप्ती डिमरी आहे. तृप्ती आणि रणबीर कपूर या दोघांमध्ये चित्रपटात इंटिमेट सीन आहेत. तिचे हे सीन्स सोशल मीडियावर सध्या चांगलेच व्हायरल होत असून तिला अनेक लोक ट्रोल करत आहेत. अशात तृप्ती डिमरीनं यावर पहिल्यांदा प्रतिक्रिया दिली आहे. 

'ॲनिमल' चित्रपटामुळे आणि तृप्ती डिमरीनं अनेक बोल्ड सीन्स दिले आहेत. तृप्ती डिमरीनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तिच्या बोल्ड सीन्सवर प्रतिक्रिया दिलेली आहे. तृप्ती डिमरीनं सांगितलं की सुरुवातीला तिला खूप वाईट वाटलं कारण तिच्या करिअरच्या सुरुवातीला खूप चांगला प्रतिसाद मिळाला आहे. तृप्ती डिमरीनं खुलासा केला की तिला आजवर 90 टक्के प्रेम मिळालं आहे आणि 10 टक्के ट्रोल करण्यात आलं. दरम्यान, यावेळी तृप्ती ही आधीपासून तयार होती कारण तिला माहित होतं की तिला मिक्स रिअॅक्शन मिळणार आहेत. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

बॉक्स ऑफिस कलेक्शन

दरम्यान, 'ॲनिमल' या चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनविषयी बोलायचे झाले तर चित्रपटानं पहिल्या दिवशी 63.8 कोटींची कमाई केली. दुसऱ्या दिवशी 66.27 कोटींची कमाई केली. तिसऱ्या दिवशी 71.46 कोटींची कमाई केली होती. चौथ्या दिवशी या चित्रपटानं 43.96 कोटींची कमाई केली. पाचव्या दिवशी 37.47 कोटींची कमाई केली होती. तर काल बुधवारी सहाव्या दिवशी या चित्रपटानं 30 कोटींची कमाई केली. भारतीय बॉक्स ऑफिसवर या चित्रपटानं 312.96 कोटींची कमाई केली आहे. तर वर्ल्ड वाईड बॉक्स ऑफिस कलेक्शनविषयी बोलायचे झाले तर इतक्यात चित्रपटानं 500 कोटींचा आकडा पार केला आहे. 

हेही वाचा : Photo : अखेर सचिन पिळगावकरांनी घेतली ज्युनिअर महमुद यांची भेट!

या चित्रपटाचे दिग्दर्शन संदीप रेड्डी वांगा यांनी केले आहे. तर रणबीर, रश्मिका आणि तृप्तीसोबत या चित्रपटात अनिल कपूर महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. त्यांच्याशिवाय शक्ती कपूर देखील या चित्रपटात दिसले. तर बॉबी देओल या चित्रपटात खलनायकाच्या भूमिकेत आहे.

Read More