Viral Video | सोशल मीडियावर पुन्हा एक जबरदस्त जुगाड व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हालाही मजा येईल. त्यामुळे तुम्हीही अशा भन्नाट व्हिडिओंवर मस्त कमेंट द्याल. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.
बहुतेक वेळा घरी येणार एलपीजी गॅस सिलेंडर कसे उचलावे असा प्रश्न पडतो. गॅस भरलेला असल्यामुळे सिलेंडर जड असते. परंतु जड सिलेंडरही एका व्यक्तीने असा भन्नाट जुगाड करून उचलला की तुम्ही म्हणाल वाह उस्ताद...
व्हायरल व्हिडिओमध्ये दिसते की, एक व्यक्ती एलपीजी सिलेंडरसाठी ट्रॉली आणतो. ज्यामुळे तो अगदी आरामात भरलेला सिलेंडर उचलतो. या ट्रॉलीला चाकं असल्यामुळे उचललेले सिलेंडर इकडेतिकडे अलगद हलवता येते.
हा व्हिडिओ आयएएस अधिकारी एम.व्ही. राव यांनी शेअर केला आहे. त्यावर कॅप्शन देत त्यांनी म्हटले की, ग्रासरूट इनोवेशन, जिंदगी को आसान बना दिया.
या व्हिडिओला सोशल मीडियावर चांगलीच पसंती मिळत आहे. अनेक लोक ही ट्रॉली नक्की कशी बनवली असाही प्रश्न विचारत आहेत. तसंच या व्हिडिओवर असंख्य कमेंट देखील आल्या आहेत.
Grassroot Innovations
— Dr. M V Rao, IAS (@mvraoforindia) March 28, 2021
Making Life Easy
(Video @ Social Media) pic.twitter.com/Yj6ZcCSjfy