Marathi News> मनोरंजन
Advertisement

'तुझे मेरी कसम' म्हणतं रितेश-जेनेलियाचा खास अंदाज

सिनेमा 17 वर्षे पूर्ण 

'तुझे मेरी कसम' म्हणतं रितेश-जेनेलियाचा खास अंदाज

मुंबई : रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसोझा-देशमुख हे बॉलिवूडमधील एक आदर्श कपल. या दोघांचा लव्हस्टोरी आपल्याला माहितच आहे. 'तुझे मेरी कसम' या सिनेमात पहिल्यांदा एकत्र काम करून दोघांची ओळख झाली आणि पुढे मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. ज्या सिनेमामुळे दोघांची ओळख झाली त्या सिनेमाने 3 जानेवारी रोजी 17 वर्षे पूर्ण केली आहेत. याची आठवण म्हणून जेनेलिया-रितेशने एक व्हिडिओ शेअर केला आहे. 

रितेश-जेनेलियाच्या पहिल्या सिनेमाला १७ वर्षं पूर्ण झाली आहेत. तसेच या सिनेमाबरोबरच त्यांच्या लव्हस्टोरीला ही १७ वर्ष पुर्ण झाली आहेत. यानिमित्तानं या दोघांनी लातूरच्या बाभळगावमधल्या आपल्या शेतात प्रेमाचं खास सेलिब्रेशन देखील केलं आहे. या सेलिब्रेशनचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. 

‘तुझे मेरी कसम’ या चित्रपटात रितेश आणि जेनेलिया मुख्य भूमिकेत झळकले आहेत. या चित्रपटाचं दिग्दर्शन के. विजयभास्कर यांनी केलं असून निर्मिती रामोजी राव,ए.व्ही.राव यांची आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

#17YearsOfTujheMeriKasam

A post shared by Riteish Deshmukh (@riteishd) on

रितेश देशमुख आणि जेनेलिया अनेकदा सोशल मीडियावर आपले खासगी व्हिडिओ शेअर करतात. या व्हिडिओच्या माध्यमातून अनेकदा त्यांच प्रेम, कौटुंबिक जिव्हाळा आपल्या समोर येत असतो. रितेश आणि जेनेलियाने यंदा आपला थर्टी फस्ट देखील बाभूळगावात साजरा केला. आपल्या दोन्ही मुलांसोबत फोटो शेअर करून नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या होत्या.

Read More