Marathi News> मनोरंजन
Advertisement

टिव्ही अभिनेत्याची गळफास घेऊन आत्महत्या

28 वर्षीय अभिनेत्याची गळफास घेऊन आत्महत्या

टिव्ही अभिनेत्याची गळफास घेऊन आत्महत्या

मुंबई - 28 वर्षीय टीव्ही अभिनेता राहुल दीक्षित याने मुंबईत बुधवारी सकाळी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट असून पोलीस अधिक तपास करत आहेत. याप्रकरणी पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे. 

एएनआय या वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार आज सकाळी 28 वर्षीय अभिनेत्याने आत्महत्या केल्याचे उघड झाले. यापूर्वीही अनेक बॉलिवूड तसेच टेलिव्हिजन कलाकारांनी आत्महत्या केल्या आहेत. वैयक्तिक किंवा कामाच्या ठिकाणी आलेल्या नैराश्यातून अनेकांनी आत्महत्या केल्या होत्या. राहुल दीक्षितने आत्महत्या का केली? याबाबत अधिक तपास सुरू आहे. 

 

Read More