Marathi News> मनोरंजन
Advertisement

'तुझे कपडे उतरवून...' साजिद खानवर आणखी एका अभिनेत्रीकडून लैंगिक शोषणाचा आरोप!

Navina Bole On Sajid Khan: साजिदवरील आरोपांची मालिका काही थांबण्याचे नाव घेत नाहीय. 

'तुझे कपडे उतरवून...' साजिद खानवर आणखी एका अभिनेत्रीकडून लैंगिक शोषणाचा आरोप!

TV Actress Navina Bole Accused Sajid Khan: सादिज खान त्याच्या दिग्दर्शन करियरपेक्षा लैंगिक छळाच्या आरोपांमुळे सध्या जास्त चर्चेत असतो. मी टू मोहीम सुरु असताना अनेक अभिनेत्रींनी साजिद खानवर गंभीर आरोप केले. पण साजिदवर आरोपांची मालिका काही थांबण्याचे नाव घेत नाहीय. आता आणखी एका अभिनेत्रीने साजिद खानवर गंभीर आरोप केले आहेत. कोण आहे ही अभिनेत्री? यावेळेस साजिद खानवर काय आरोप झालेयत? सविस्तर जाणून घेऊया. 

'इश्कबाज' आणि 'मिले जब हम तुम' सारख्या टीव्ही शोमध्ये दिसलेल्या नवीना बोलेने दिग्दर्शक साजिद खानवर गंभीर आरोप केले. यामुळे बॉलिवूड इंडस्ट्रीत पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. तिने कास्टिंग काउचबद्दल धक्कादायक खुलासा केलाय. साजिद खान खूप वाईट माणूस असल्याचं नवीनाने म्हटलंय. त्याने मला त्याच्या घरी बोलावले आणि माझे कपडे काढण्यास सांगितल्याचा आरोप नवीनाने केलाय. 

नवीना बोलेने सुभोजित घोषला त्याच्या यूट्यूब चॅनलसाठी मुलाखत दिली. यावेळी तिने विविध विषयांवर भाष्य केले. दरम्यान याच मुलाखतीत तिने कास्टिंग काउचबद्दल धक्कादायक खुलासा केला. साजिद खान इंडस्ट्रीतील इतर महिलांचा कसा अपमान करतो, याबद्दल ती खुलेपणाने बोलली. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Navina Bole (@navina_005)

'तू तुझे कपडे का काढत नाहीस'

साजिद खान 'हे बेबी' चित्रपटाचे काम करत असताना त्याने मला त्याच्या घरी बोलावल्याचे नवीना म्हणाली. 'जेव्हा त्याने मला फोन केला तेव्हा मी खूप उत्साहित होते. मग त्याने म्हटले की तू तुझे कपडे काढून अंतर्वस्त्रात का बसत नाहीस? मला पहायचे आहे की तू किती आरामदायी आहेस,' साजिद खान मला म्हणाल्याचा आरोप नवीनाने केला. ही कटु आठवण 2004 ते 2006 दरम्यानची असून तेव्हा मी ग्लॅडरॅग्जमध्ये काम केले होते, असेही तिने पुढे सांगितले. 

'काहीतरी सांगून तिथून निघून गेले'

'तू स्टेजवर बिकिनी का घातलीस? काय अडचण आहे? तू इथे आरामात आणि शांतपणे बसू शकतोस', असे साजिद म्हणाला. यावर मी म्हणाले, 'मला घरी जावे लागेल. जर तुला खरोखर मला बिकिनीमध्ये पहायचे असेल तर ठीक आहे, मी चित्रपटात ते घालेन. पण मी इथे बसून आत्ता माझे कपडे काढू शकत नाही', असे मी त्यावेळी सांगितल्याचे नवीनाने आपल्या मुलाखतीत सांगितले. मी कसं तरी त्या ठिकाणाहून बाहेर पडण्यात यशस्वी झाले. यानंतर तू का येत नाही? तू कुठे पोहोचलीस? असे त्याने मला किमान 50 वेळा फोन करून विचारलयाची आठवण तिने सांगितली. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Navina Bole (@navina_005)

साजिद खानवर MeToo आरोप

2018 मध्ये साजिद खानवर MeToo चे गंभीर आरोप झाले. त्यानंतर इंडस्ट्रीशी संबंधित अनेक महिलांनी साजिदवर गंभीर आरोप केले होते. असे असले तरी यातून साजिद खानला क्लीन चिट मिळाली.

Read More