Marathi News> मनोरंजन
Advertisement

सिनेसृष्टीला आणखी एक धक्का, या अभिनेत्री केली आत्महत्या

का केली आत्महत्या? 

सिनेसृष्टीला आणखी एक धक्का, या अभिनेत्री केली आत्महत्या

मुंबई : गेल्या कित्येक दिवसांपासून सिनेसृष्टीला मोठमोठे धक्के बसत आहेत. तारक मेहता का उल्टा चष्मा मधील डॉ हाथी म्हणजे कवि कुमार आझाद यांच्या निधनानंतर अभिनेत्री रिता भादुरी यांचे निधन झाले. या धक्क्यातून कलाकार सावरतात तोच एका अभिनेत्रीच्या निधनाची बातमी समोर आली आहे. 

अभिनेत्री प्रियंका हिच्या निधनाची बातमी समोर आली आहे. प्रियंकाने चेन्नईच्या Valasaravakkam मध्ये असलेल्या आपल्या घरात आत्महत्या केली आहे. अभिनेत्रीच्या घरात काम करणाऱ्या बाईने जेव्हा प्रियंकाचा मृतदेह फासाला लटकलेला पाहिला तेव्हा ही घटना उघडकीस आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, काही अडचणींमुळे अभिनेत्री प्रियंकाने आत्महत्या केली आहे. काही वर्षांपूर्वी प्रियंकाच लग्न झालं होतं मात्र अद्याप तिला मुलं झालेलं नाही. या घटनेनंतर प्रियंकाचा मृतदेह पोस्टमार्टम रिपोर्टसाठी पाठवलं आहे. अद्याप घटनास्थळावरून कोणतेही सुसाईड नोट सापडलेली नाही.

 प्रियंका सन टीव्हीवर 'भैरवी' या मालिकेत काम करत होती. या अगोदर तिला तामिळमधील चर्चेत शो Vamsam मुळे ओळख मिळाली होती. या शोमध्ये ती ज्योतिकाचं कॅरेक्टर साकारत होती. प्रियंकाच्या निधनामुळे तामिळ सिनेसृष्टीतील कलाकार हैराण आहेत. 

Read More