Marathi News> मनोरंजन
Advertisement

इंग्रजी बोलण्याच्या नादात 'या' कलाकारांचा पोपट झाला रे...

बॉलिवूडच्या झगमगत्या विश्वात अनेक स्टार फक्त इंग्रजी बोलण्याला प्राधान्य देतात, पण...  

इंग्रजी बोलण्याच्या नादात 'या' कलाकारांचा पोपट झाला रे...

मुंबई : बॉलिवूडच्या झगमगत्या विश्वात अनेक स्टार फक्त इंग्रजी बोलण्याला प्राधान्य देतात. पण असे काही स्टार आहेत, ज्यांनी इंग्रजी बोलण्याचा प्रयत्न केला. पण त्यांचा तो प्रयत्न फेल झाला आणि सोशल मीडियावर त्यांना अनेकांनी ट्रोल केलं. आशाचं काही सेलिब्रिटींबद्दल आज आपण जाणून घेणार आहेत...

शहनाज गिल
'बिग बॉस 13' मधून अभिनेत्री शहनाज गिल प्रसिद्धीस आली. तेव्हा कळालं की शहनाजला इंग्रजी बोलता येत नाही. ज्यामुळे तिला अनेकदा ट्रोल देखील करण्यात आलं. पण शहनाज म्हणली की इंग्रजी चांगली नसली, तरी मला इंडस्ट्रीमध्ये काम मिळत आहे. 

नेहा कक्कर 
'नाराजगी' गाण्यामध्ये काही इंग्रजी ओळी होत्या. त्या ओळी नेहाच्या आवाजात स्वरबद्ध करण्यात आल्या. तेव्हा इंग्रजी एसेंटमुळे तिला ट्रोल करण्यात आलं. 

सपना चौधरी
बिग बॉसच्या घरात सपनाने तिचा अंदाज दाखवला. बिग बॉसमध्ये तिने अनेकदा इंग्रजी बोलण्याचा निर्णय घेतला. पण तिचा प्रयत्न फेल ठरला आणि ती सोशल मीडियावर ट्रोल झाली. 

कपिल शर्मा 
'द कपिल शर्मा शो'मध्ये कपिल प्रत्येक वेळी इंग्रजी बोलण्याचा प्रयत्न करतो. त्याचा प्रयत्न फेल ठरतो. पण तो कायम स्वतःच्या इंग्रजीला मस्करीत घेतो आणि प्रत्येकाला हसण्यास भाग पाडतो.  

Read More