Marathi News> मनोरंजन
Advertisement

'जय शिवाजी, जय तान्हाजी' सोशल मीडियावर एकच जयजयकार

 शत्रूशी लढणाऱ्या तान्हाजींची झलक पाहता.... 

'जय शिवाजी, जय तान्हाजी' सोशल मीडियावर एकच जयजयकार

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून अभिनेता अजय देवगण  Tanhaji  'तान्हाजी- द अनसंग वॉरियर' या त्याच्या आगामी चित्रपटाशी निगडीत बऱ्याच पोस्ट करत आहे. या प्रत्येक पोस्टवर नेटकऱ्यांनी उत्सफूर्तपणे दाद देण्यास सुरुवात केली आहे. चित्रपटाचा पोस्टर आणि टीझर पोस्ट केल्यानंतर स्वराज्याप्रती प्रत्येकानेच आपल्या भावना मांडण्यास सुरुवात केली. 

कोणी तान्हाजी मालुसरे यांच्या पराक्रमाची गाथा सर्वांसमोर आणली तर, कोणी 'जय शिवाजी, जय तान्हाजी' असा नारा दिला. प्रत्येकानेच पुन्हा एकदा शिवछत्रपतींच्या स्वराज्यासाठी योगदान देणाऱ्या मावळ्यांच्या साहसाची दाद दिली. ओम राऊत दिग्दर्शित 'तान्हाजी- द अनसंग वॉरियर' या चित्रपटाच्या टीझरमध्येही अवघ्या काही सेकंदांतच अंगावर काटा उभा राहत आहे. 

हातात स्वराज्याचा भगवा झेंडा घेऊन त्राण आहेत तोवर शत्रूशी लढणाऱ्या तान्हाजींची झलक पाहता चित्रपटाच्या ट्रेलरप्रती प्रेक्षकांची उत्सुकता व्यक्त केली आहे. फक्त चाहतेच नव्हे, तर अजय देवगनच्या या चित्रपटासाठी सिनेविश्वातही उत्सुकता आहे. अर्थात याला निमित्तंही तसंच आहे. 

'तान्हाजी' हा अजयच्या अभिनय कारकिर्दीतील शंभरावा चित्रपट ठरत आहे. कलाविश्वात अनेक वर्षे काम करत प्रेक्षकांचं मनोरंजन करणाऱ्या या अभिनेत्याचा शंभरावा चित्रपट हा त्याच्यालेखीसुद्धा तितकाच खास आहे. 

अजय देवगन तान्हाजी साकारत असणाऱ्या या चित्रपटामध्ये शरद केळकर, ल्यूक केनी, पद्मावती राव, काजोल, सैफ अली खान हे कलाकारही झळकणार आहेत. १० जानेवारी २०२०ला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.  

Read More