परवीन बाबींना त्यांचा शेवटच्या क्षणापर्यंत त्यांच्याबद्दल विचारणारं कोणी नव्हतं. परवीन बाबींचा जन्म 4 एप्रिल 1954 रोजी झाला आणि त्यांच निधन 20 जानेवारी 2005 रोजी मुंबईत झालं. त्या आज जरी आपल्यात नसल्या तरी त्यांच काम आजही चाहत्यांच्या लक्षात आहे. त्यांचं वैयक्तिक आयुष्यही सर्वांसाठी एक उघड पुस्तक बनलं आहे. परवीन बाबींनी बॉलिवूडमध्ये एक विशेष स्थान मिळवलं होतं. 70-80 च्या दशकात त्यांची सुंदरता आणि अभिनयाच्या कौशल्याने लाखो चाहत्यांचे मन जिंकले होते. त्यांनी अनेक सुपरहिट चित्रपटांत काम केलं, जसे की 'अमर अकबर अँथनी', 'चांदी सोना', 'सुहाग' आणि 'महान'. 80-90 च्या दशकात परवीन बाबींचे नाव अनेक कलाकारांबद्दल जोडले गेले होते. त्यात पहिले म्हणजे अमिताभ बच्चन. अमिताभ आणि परवीन यांच्या नात्याचा अफवा उडू लागलेल्या. तेव्हा अमिताभ यांनी स्वतः त्या चर्चांना फेटाळले. त्यानंतर बॉलिवूडचा प्रसिद्ध खलनायक असलेल्या डॅनी डेन्झोंगपा सोबत त्यांचा प्रेमसंबंध होता. दोघंही अनेक कार्यक्रमांमध्ये एकत्र दिसत होते. एका मुलाखतीत, डॅनींनी त्यांच्या नात्याची कबूली दिली होती आणि त्यांच्या एकत्र घालवलेल्या क्षणांचे वर्णनही केलं होतं. डॅनीसोबतचं नातं खूपच गडद आणि गाजलेलं होतं पण काही वर्षांनी ते संपलं.
डॅनीसोबतचं नातं संपल्यानंतर, परवीन बाबींचं नाव कबीर बेदींशी जोडले गेले. कबीर बेदी आधीच विवाहित होते, तरीही परवीन बाबी त्यांच्या प्रेमात होत्या. या नात्यात एका काळात इटलीला पळून जाण्याची घटना घडली. परवीन बाबी इतक्या प्रेमात होत्या की त्यांनी कबीर बेदींना घेऊन इटलीला पळून गेल्या. पण कबीर बेदीच्या पहिल्या पत्नी सोडण्याच्या निर्णयानंतर त्यांचं नातंही संपुष्टात आलं.
महेश भट्ट यांच्यासोबत परवीन बाबींचा प्रेमसंबंधही चर्चेत आला होता. महेश भट्ट जे आधीच विवाहित होते आणि एका मुलीचे वडील होते, यांच्यासोबत परवीन बाबींचे लिव्ह-इन रिलेशनशिप होते. दोघंही एकत्र राहात होते, पण या नात्यातही टिकाव लागला नाही. 1980 मध्ये महेश भट्ट आणि परवीन बाबींचं नातं तुटलं आणि याच काळात परवीन बाबी एक गंभीर मानसिक आजाराशी झुंजत होत्या.
परवीन बाबी आयुष्यभर प्रेमाच्या शोधात होत्या, पण शेवटच्या क्षणांमध्ये त्या एकट्याच होत्या. त्यांचा मानसिक आजार आणि त्यांचं एकाकी जीवन त्यांच्या मृत्यूच्या कारणांमध्ये एक महत्त्वपूर्ण भूमिका निभावत होती. 2005 मध्ये, परवीन बाबींच्या मृत्यूची माहिती तीन दिवसांनी मिळाली. घराबाहेर दुधाचे पाकिटे आणि वर्तमानपत्रे साचलेले पाहून लोकांना त्यांच्या मृत्यूची माहिती मिळाली. आजूबाजूच्या लोकांना काहीतरी गडबड जाणवली आणि त्यांनी पोलिसांना बोलावले. जेव्हा दरवाजा तोडला गेला तेव्हा परवीन बाबींचा मृतदेह बेडवर पडलेला आढळला. लोकांना त्यांच्या मृत्यूच्या स्थितीमुळे धक्काचं बसला होता. आजही परवीन बाबींच्या जीवनाचा हा भाग लोकांना एक महत्त्वपूर्ण शिकवण देतो.