Marathi News> मनोरंजन
Advertisement

बॉलिवूड ड्रग्स कनेक्शनवर रामदास आठवलेंनी सुचवला तोडगा

सुशांत सिंह राजपूत प्रकरणाचं ड्रग्स कनेक्शन 

बॉलिवूड ड्रग्स कनेक्शनवर रामदास आठवलेंनी सुचवला तोडगा

नवी दिल्ली : हिंदी सिनेसृष्टीतील कलाकार हे प्रेक्षकांचे आदर्श असतात. त्यामुळे जे  चित्रपट कलावंत ड्रग्स अंमली पदार्थ सेवन करतात. ज्यांच्या नावावर  नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडून अंमली पदार्थ सेवन करतात म्हणून  शिक्केमोर्तब झाले आहे. अशा कलाकारांना चित्रपट निर्मात्यांनी आपल्या चित्रपटात काम देऊ नये. अन्यथा अशा चित्रपटांचे चित्रीकरण आरपीआय बंद पाडेल. तसेच, अंमली पदार्थ सेवन करणाऱ्या कलाकारांचे  चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही असा ईशारा आज रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिला आहे. 

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो तर्फे अंमलीपदार्थ वापरल्याच्या संशयातून  सध्या फक्त महिला कलाकारांची चौकशी केली जात असल्याचा संदेश जात आहे. लागोपाठ अभिनेत्रींचीच नावे पूढे आली आहेत.यात पुरुष कलाकारांची नावे जर असतील तर त्यांची त्वरित चौकशी करावी. स्त्री पुरुष भेदभाव नसावा मात्र यात केवळ अभिनेत्रींचीच नावे पुढे येत आहेत या प्रश्नांकडेही नार्कोटिक्स विभागाने लक्ष द्यावे असे आवाहन ना रामदास आठवले यांनी केले आहे. 

दिशा सालीयन यांचा संशयास्पद मृत्यू ही आत्महत्या नसून हत्या आहे. दिशा सालीयन यांच्या संशयास्पद मृत्यूची सीबीआय चौकशी व्हावी या मागणी चा पुनरुच्चार रामदास आठवले यांनी आज केला. अभिनेत्री पायल घोष यांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार सिने दिग्दर्शक अनुराग कश्यप यांना मुंबई पोलिसांनी अटक केली पाहिजे अशी मागणी रामदास आठवले यांनी केली आहे.

Read More