Marathi News> मनोरंजन
Advertisement

उर्फीचा फोटो पाहून चाहते हैराण, ओठांना नेमकं काय झालं? म्हणाली- मला...

उर्फी जावेदने सोशल मीडियावर असा एक व्हिडीओ शेअर केलाय ज्यामुळे चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. उर्फीचे सुजलेले ओठ पाहून चाहते गोंधळले आहेत. 

उर्फीचा फोटो पाहून चाहते हैराण, ओठांना नेमकं काय झालं? म्हणाली- मला...

Urfi Javed: नेहमी हटके लूक आणि हटके फॅशनमुळे सोशल मीडियावर चर्चेत असणारी उर्फी जावेद सध्या सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. सोशल मीडिया आणि रिअ‍ॅलिटी शोमधून उर्फी जावेदला खूप प्रसिद्धी मिळाली आहे. अशातच तिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून तो चर्चेत आला आहे. उर्फीने हा व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. जो पाहून तिच्या चाहत्यांमध्ये चिंता निर्माण झाली. या व्हिडिओमध्ये तिचा चेहरा आणि ओठ फारच सुजलेले दिसत आहेत. अनेकांना वाटलं की तिच्या आरोग्याशी संबंधित काही गंभीर घडले आहे, मात्र खरी गोष्ट काहीशी वेगळीच आहे.

उर्फीच्या ओठांना नेमकं काय झालं?

सोशल मीडियावर उर्फी जावेदचा व्हिडीओ पाहून अनेकांनी चिंता व्यक्त केली आहे. उर्फी जावेदचा मोठा चाहता वर्ग आहे. या व्हिडिओसोबत उर्फीने कॅप्शनमध्ये स्पष्ट सांगितले आहे की, तिने लिप फिलर्स काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या काही वर्षांपासून तिच्या ओठांमध्ये लिप फिलर्स होते. पण ते नेहमी योग्य जागी राहत नव्हते आणि त्यामुळे तिला त्रास होत होता. त्यामुळे तिने एक विश्वासार्ह डॉक्टर निवडून योग्य उपचार करून घेतले आणि तो काढून टाकला. मात्र, तिने तो काढतानाचा संपूर्ण व्हिडीओ शूट केला असून तो इन्स्टाग्रामवर शेअर केलाय. यामध्ये तिच्या ओठांची अवस्था पाहून अनेकांना धक्का बसला आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

18 व्या वर्षी केली होती ट्रीटमेंट, आता घेतला मोठा निर्णय

उर्फी जावेदने सांगितले की तिने वयाच्या अवघ्या 18 व्या वर्षी लिप फिलर ट्रीटमेंट घेतली होती. आता जवळपास 9 वर्षांनी ती हे लिप फिलर्स हटवत आहे. सध्या उर्फीचा लिप फिलर्स हटवतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असून, अनेकजण तिच्या प्रामाणिकपणाचे आणि धाडसाचे कौतुक करत आहेत.

उर्फी जावेद तिच्या फॅशन सेन्स, खुल्या मतांमुळे आणि वेगळ्या अंदाजामुळे कायम चर्चेत असते. मात्र यावेळी तिच्या सौंदर्यातील बदलांबाबत उघडपणे बोलत, ती अनेक तरुणांसाठी एक सकारात्मक उदाहरण ठरत आहे.

Read More