Marathi News> मनोरंजन
Advertisement

उरी सिनेमाचा व्यवसाय वाढता वाढता वाढे

उरीच्या सततच्या चढत्या क्रमाने द अॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टरला नमते घ्यावे लागले आहे.

उरी सिनेमाचा व्यवसाय वाढता वाढता वाढे

मुंबई : सिनेमात मुख्य भूमिकेत असणाऱ्या अभिनेता विकी कौशलचा 'उरी- द सर्जिकल स्ट्राईक' ११ जानेवारीला प्रदर्शित झाला. पहिल्या ४ दिवसांत सिनेमाने ४६.२४ कोटी रुपयांचा गल्ला जमवला. २०१६ साली जम्मू-काश्मिरमध्ये उरी हल्ल्यात दहशदवाद्यांनी भारतीय सैनिकांवर हल्ला केला. १८ सप्टेंबर २०१६ साली उरीमध्ये झालेल्या स्फोटात १९ भारतीय जवानांनी आपल्या प्राणाची आहुती दिली होती. देशभक्तीवर आधारलेल्या सिनेमाला प्रेक्षकांची विशेष पसंती दर्शवली. तरण आदर्श यांच्या सांगण्यानुसार सिनेमाने पहिल्या दिवशी ८.२० कोटी, दुसऱ्या दिवशी १२.४३ कोटी तिसऱ्या दिवशी १५.१० कोटी तर चौथ्या दिवशी १०.५१ कोटींचा गल्ला जमवला. उरीच्या सततच्या चढत्या क्रमाने द अॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टरला नमते घ्यावे लागले आहे.

 

राजी आणि संजू सिनेमांनंतर उरी- द सर्जिकल स्ट्राईक सिनेमात दमदार भूमिका करणाऱ्या विकी कौशलच्या प्रेमाच्या चर्चा रंगत आहेत. विकी आणि हरलीन सध्या एकमेकांना डेट करत आहेत. सोशल मीडियावर हे दोघेही एकमेकांचे फोटो शेअर करत असतात. हरलीन टीव्ही अभिनेत्री, यशस्वी मॉडेल आणि लोकप्रिय टीव्ही सूत्रधार आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

High SirURI

A post shared by Harleen Sethi (@itsharleensethi) on

नुकताच उरीच्या टीमने सक्सेस पार्टी साजरी केली. त्यात संपूर्ण टीमने सारखे टी-शर्ट घातले होते. टी-शर्ट वर ‘How’s The Josh’लिहिले होते. उरीच्या टीमच्या सक्सेस पार्टीमध्ये हरलीनसुद्धा तसाच टी-शर्ट घालून उपस्थित होती.

Read More