Marathi News> मनोरंजन
Advertisement

16 व्या वर्षी लग्न, 17 वर्षी बनली जुळ्या मुलांची आई, 18 व्या वर्षी घेतला घटस्फोट, कोण आहे ही अभिनेत्री?

इंडस्ट्रीमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्या नेहमी त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असतात. आज आम्ही अशाच एका अभिनेत्रीबद्दल सांगणार आहोत जिने वयाच्या 18 वर्षी घटस्फोट घेतला. 

16 व्या वर्षी लग्न, 17 वर्षी बनली जुळ्या मुलांची आई, 18 व्या वर्षी घेतला घटस्फोट, कोण आहे ही अभिनेत्री?

Bollywood News: बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्या अभिनयासोबतच त्यांच्या खाजगी आयुष्यामुळे देखील नेहमी सोशल मीडियावर चर्चेत असतात. अशीच एक टीव्ही अभिनेत्री  जिने 'कसौटी जिंदगी'मध्ये कोमोलिका बसुची भूमिका साकारून प्रचंड प्रसिद्धी मिळवली. या अभिनेत्रीचे नाव उर्वशी ढोलकिया आहे. ती तिच्या ग्लॅमरस लूक, शिफॉनची साडी, ब्राइट लिपस्टिक आणि केसांच्या हटके हेअर स्टाईलने तिला खास ओळख दिली होती.  

उर्वशीने एका मुलाखतीत सांगितले होते की, 16 वर्षांनंतर देखील चाहते तिच्या कोमोलिकाच्या भूमिकेविषयी चर्चा करतात. ज्यामुळे तिला अजूनही प्रोत्साहन मिळते. उर्वशीचे करिअर तर यशस्वी झाले. मात्र, तिची वैयक्तिक आयुष्य हे खूप खडतर राहिले. 

17 व्या वर्षी झाली जुळ्या मुलांची आई, 18 व्या वर्षी घटस्फोट

उर्वशी ढोलकियाने 90 च्या दशकाच्या सुरुवातीला इंडस्ट्रीमध्ये पदार्पण केले. अभिनेत्रीला 'कसौटी जिंदगी की' या मालिकेतून प्रसिद्धी मिळाली. तिला मोठ्या प्रमाणात लोकप्रियता मिळाली पण तिच्या वैयक्तिक आयुष्यात अनेक आव्हाने होती. अभिनेत्री उर्वशी ढोलकियाने 16 व्या वर्षी लग्न केले. वयाच्या 17 व्या वर्षी ती आई झाली तर लग्नानंतर फक्त दीड वर्षातच तिने घटस्फोट घेतला. घटस्फोटानंतर तिने तिचे जुळी मुलं सागर आणि क्षितिज यांचा एकट्याने संभाळ केला. त्यांचे शिक्षण पूर्ण केले. जरी ती लहान असली तरी तिने सर्व जबाबदाऱ्या खंबीरपणे हाताळल्या आणि कधीही हार मानली नाही.

उर्वशीच्या नात्याबद्दल पसरल्या होत्या अफवा

उर्वशी ढोलकियाने घटस्फोटानंतर तिचे सर्व लक्ष तिच्या कुटुंबावर आणि करिअरवर केंद्रित केले होते. त्यावेळी तिचे नाव अनेक लोकांशी जोडले गेले. मात्र, तिने कधीही कोणाशीही तिच्या नात्याची पुष्टी केली नाही. 2016 मध्ये तिने दिलेल्या एका मुलाखतीत हटले होते की एकटी आई असल्याने तिचा सर्व वेळ वाया गेला. तिने आयुष्यात काहीही लपवले नाही. मात्र, तिला तिच्या वैयक्तिक गोष्टी गॉसिपमध्ये बदलू द्यायचे नव्हते. तिने कधीही भेटलेल्या उद्योगपतीशी नाते जोडल्याबद्दल विनोद केला. त्यावेळी तिने सांगितले होते की, ती तिच्या मुलांना सर्वात प्रथम जास्त महत्त्व देते. त्यानंतर इतर कामांना ती प्राधान्य देते.  

Read More