Marathi News> मनोरंजन
Advertisement

लंडनमध्ये उर्वशी रौतेलाची डिओर बॅग चोरीला, 70 लाखांचं नुकसान, नेमकं काय घडलं?

Urvashi Rautela: प्रसिद्ध अभिनेत्री उर्वशी रौतेला पुन्हा एकदा चोरीच्या घटनेमुळे चर्चेत आली आहे.  लंडन विमानतळावरून तिचे 70 लाख रुपयांचे दागिने चोरीला गेलेत. 

लंडनमध्ये उर्वशी रौतेलाची डिओर बॅग चोरीला, 70 लाखांचं नुकसान, नेमकं काय घडलं?

Urvashi Rautela: बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेलाच्या डिओर ब्रँडच्या लक्झरी बॅगची लंडनच्या गॅटविक एअरपोर्टवरून चोरी झाली आहे. या बॅगेमध्ये तब्बल 70 लाख रुपये किमतीचे दागिने होते, असा दावा अभिनेत्रीने स्वतः आपल्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये केला आहे.

बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला नुकतीच लंडनमध्ये विंबलडन टेनिस टूर्नामेंट पाहण्यासाठी गेली होती. याच वेळी मुंबईहून एमिरेट्स फ्लाइटने लंडन गॅटविक एअरपोर्टवर पोहोचल्यानंतर बॅगेज बेल्टवरून तिची डिओर ब्राउन बॅग अचानक गायब झाली. इन्स्टाग्रामव पोस्ट शेअर करत उर्वशी रौतेलाने सांगितले की, अन्याय सहन करणे म्हणजे अन्यायाला प्रोत्साहन देणे आहे. चोरी झालेली बॅग मिळवण्यासाठी तिने तात्काळ मदतीची मागणी केली आहे.

अभिनेत्रीने केली कारवाईची मागणी

तिने तिच्या फ्लाइट डिटेल्ससह बॅगेचा फोटो देखील शेअर केला असून एमिरेट्स एअरलाईन्स आणि लंडन पोलिसांना टॅग करून तातडीने कारवाई करण्याचे आवाहन केले आहे. उर्वशीने हे देखील स्पष्ट केले आहे की, एअरपोर्ट अधिकाऱ्यांनी अजूनपर्यंत तिच्या तक्रारीवर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

याआधीही 2023 मध्ये उर्वशी रौतेलाने असाच एक दावा केला होता की, भारत-पाकिस्तान सामन्यादरम्यान नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये तिचा 24 कॅरेट सोन्याचा आयफोन चोरीला गेला होता. ज्यासाठी तिने सोशल मीडियावर मदतीचे आवाहन केले होते.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

उर्वशीच्या ड्रेसची किंमत 14 कोटी

अभिनेत्री उर्वशी रौतेलाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे म्हटले तर शेवटची ‘डाकू महाराज’ या चित्रपटात झळकली होती. ज्यामध्ये तिने नंदमुरी बालकृष्णसोबत काम केले होते. हा चित्रपटाला देखील प्रेक्षकांकडून चांगली पसंती मिळाली. विंबलडनदरम्यान उर्वशी रौतेलाच्या स्टाईल आणि ड्रेसनेही तिथे असणाऱ्या सर्वांचे लक्ष वेधले होते. अभिनेत्रीने परिधान केलेल्या ड्रेसची किंमत तब्बल 14 कोटी रुपये असल्याची चर्चा होती.

सध्या अभिनेत्री उर्वशी रौतेला तिच्या बॅग चोरीच्या प्रकारामुळे सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आली आहे. अभिनेत्री नेहमी चाहत्यांच्या संपर्कात असून नेहमी तिच्या वैयक्तिक आयुष्यातील प्रत्येक घडामोड सोशल मीडियावर शेअर करताना दिसत असते. तिचा मोठा चाहता वर्ग आहे. 

Read More