Marathi News> मनोरंजन
Advertisement

Kantara 2 मध्ये Urvashi Rautela ची एन्ट्री? उर्वशीच्या पोस्टनं एकच खळबळ

Urvashi Rautela ला नं सोशल मीडियावर शेअर केलेला फोटो प्रचंड व्हायरल झाला आहे. 

Kantara 2 मध्ये Urvashi Rautela ची एन्ट्री? उर्वशीच्या पोस्टनं एकच खळबळ

Urvashi Rautela In Kantara 2 : बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला (Urvashi Rautela) ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. उर्वशी ही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहते. उर्वशीचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या फोटोत उर्वशी ही कन्नड सुपरस्टार ऋषभ शेट्टीसोबत (Rishab Shetty) दिसत आहे. त्या दोघांचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

उर्वशीनं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये उर्वशीनं पिवळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. तर ऋषभ शेट्टीनं काळ्या आणि पांढऱ्या रंगाच्या स्ट्राइपचं टी-शर्ट परिधान केलं आहे.  दरम्यान, हा फोटो सोशल मीडियावर शेअर करत कांतार 2 आणि हात जोडण्याचे इमोजी तिनं कॅप्शनमध्ये दिलं आहे. उर्वशी शेअर केलेला फोटो व्हायरल झाला आहे. हा फोटो सोशल मीडियावर पाहताच नेटकऱ्यांनी कमेंट केल्या आहेत. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, 'ऋषभ शेट्टीच बरोबर आहे, फक्त ऋषभ असावा.' दुसरा नेटकरी म्हणाला, 'दीदी तुझ्या आयुष्यात किती ऋषभ आहेत. दीदीचे आयुष्य हे सगळ्या ऋषभच्या अवतीभोवती फिरत आहे. तिसरा नेटकरी म्हणाला, 'ऋषभ पंत नाही तर ऋषभ शेट्टी आहे.' आणखी एक नेटकरी म्हणाला, 'ऋषभ हे नावच पुरेसे आहे. दुसरा नेटकरी म्हणाला, RP च्या यशानंतर आता RS आला आहे. याशिवाय अनेक नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या कमेंट केल्या आहेत. 

हेही वाचा : Sidharth-Kiara लग्नानंतर 70 कोटींच्या 'या' आलिशान बंगल्यात राहणार, पाहा Video

उर्वशीच्या चाहत्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे. अभिनेत्री म्हणून उर्वशीसाठी हा मोठा ब्रेक मानला जात आहे. सोशल मीडियावर चाहते उर्वशीचे अभिनंदन करत आहेत. उर्वशीसाठी 2023 हे वर्ष खूप छान असणार आहे, असे ते सांगत आहेत. खरं तर, वर्षाच्या सुरुवातीलाच उर्वशीनं 'वॉल्टेअर वीरैया' या चित्रपटातील मेगास्टार चिरंजीवीसोबत 'बॉस पार्टी' या पार्टी आयटम सॉंगवर डान्स करून साऊथच्या प्रेक्षकांची मने जिंकली होती. उर्वशीने नुकताच तेलुगू अभिनेता राम पोथिनेनीसोबत एक चित्रपटही साइन केला आहे. यावर्षी उर्वशी रणदीप हुडासोबत मुख्य भूमिकेत इन्स्पेक्टर अविनाश या वेबसिरीजमध्ये दिसणार आहे. यापूर्वी हॉलिवूड अभिनेते मिशेल मोरोन आणि जेसन डेरुलो यांच्यासोबत एका अमेरिकन चित्रपटासाठी कॉन्ट्रॅक्ट करण्यात आल्याचे म्हटले जात आहे. 

Read More