Marathi News> मनोरंजन
Advertisement

Saif Ali Khan Attack: 'डायमंड स्टडेड वॉच आणि...', असंवेदनशील प्रतिक्रियेनंतर उर्वशी रौतेला ट्रोल; माफी मागितली पण...

Saif Ali Khan Attack:  अभिनेत्रीनं असंवेदनशील वक्तव्य केल्यानंतर त्यावरून तिला ट्रोल करण्यात आलं. आता माफी मागितल्यानंतर देखील का झाली ती ट्रोल?

Saif Ali Khan Attack: 'डायमंड स्टडेड वॉच आणि...', असंवेदनशील प्रतिक्रियेनंतर उर्वशी रौतेला ट्रोल; माफी मागितली पण...

Saif Ali Khan Attack: बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर हल्ला झाल्यानंतर सेलिब्रिटींपासून राजकारण्यांपर्यंत सगळ्यांना आश्चर्य झालं आहे. बॉलिवूडपासून दाक्षिणात्य सिनेसृष्टीला देखील धक्का बसला आहे. उर्वशी रौतेलानं या प्रसंगी प्रश्न विचारला तर ती असं काही बोलून बसली की तिला लोकं ट्रोल करताना दिसले. सोशल मीडियावर उर्वशीला चांगलंच ट्रोल करण्यात आलं. त्यानंतर तिनं तिची चूक मान्य केली. मात्र, यानंतर तिला पुन्हा नेटकरी ट्रोल करु लागले. 

खरंतर, सैफवर झालेल्या हल्ल्याविषयी उर्वशीनं एएनआयसोबत वक्तव्य केलं. या मुलाखती दरम्यान, उर्वशीनं सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्याला घेऊन प्रश्न विचारला तर सगळ्यात आधी तर त्यांनी सैफच्या आरोग्यावरून चिंता व्यक्त केली आणि त्यानंतर अचानक ती तिच्या लग्झरी वॉच फ्लॉन्ट केले. हे व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले. जे पाहून नेटकऱ्यांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली. 

सैफला घेऊन उर्वशीला प्रश्न विचारण्यात आला तेव्हा उत्तर देत ती म्हणाली, 'मी आताच वाचलं की अखेर तो ठीक झाला आहे. पण हे खूप वाईट होतं. किती काळजी घ्यावी लागते. तुम्ही स्वत:चं विचार करा की ‘डाकू महराज’ च्या यशावर माझ्या माईनं मला ही डायमंड स्टडेड रोलेक्स घड्याळ भेट केली आणि माझ्या वडिलांनी मिनी घड्याळ भेट केली. पण हे सगळं बाहेर घालून जाताना यापुढे आम्ही घाबरू. हे सगळं घालून बाहेर पडायचं म्हटलं की किती भिती वाटते.' उर्वशीचं हे वक्तव्य ऐकल्यानंतर सगळ्यांना मोठा धक्का बसला आणि तिला ट्रोल करू लागले. त्यावर तिनं सगळ्यांची माफी देखील मागितली आहे.

यानंतर आता उर्वशीनं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये लिहिलं की प्रिय सैफ अली खान सर, मला आशा आहे की ही पोस्ट तुला शक्ती देईल. मी ही खूप दु:खी मनानं आणि अपराधीपणाच्या भावनेनं लिहित आहे. आतापर्यंत मला तुमच्यासोबत काय झालं हे माहित नव्हतं. या सगळ्यात माझ्या 'डाकू महाराज' चित्रपटाच्या यशाचा आनंद साजरा करताना मला खूप लाज वाटते. तुम्ही कोणत्या परिस्थितीत आहात हे मला माहीत नसताना मी भेट स्वीकारत आहे. मला माफ करा. तुमच्याकडे दुर्लक्ष केल्याबद्दल आणि असंवेदनशील असल्याबद्दल मला माफ करा.

पुढे उर्वशीनं लिहिलं की, 'मला जेव्हा या घटनेच्या गांभीर्याविषयी कळलं तेव्हा मी खूप आनंदी झाले. मी तुमच्या धैर्याचे आणि सहनशीलतेसमोर हात जोडते. मी ज्या पद्धतीनं वागले त्याचं मला वाईट वाटतंय. जर मी कोणत्याही प्रकारे तुमची मदत आणि समर्थन करु शकत असेन तर अजिबात संकोच करू नका. माझ्या वागण्याबद्दल मी पुन्हा एकदा तुमची माफी मागते. माझ्या भूतकाळातील वागणूकीवर मला खरंच वाईट वाटतंय. यापुढे मी असं काही करणार नाही. समजूतदारपणे सगळ्या गोष्टीकडे लक्ष देईन. उर्वशी रौतेला, मनापासून माफी मागते.'

हेही वाचा : 'माझी इच्छा आहे की माझी लेक...', अमिताभ आणि ऐश्वर्याशी होणाऱ्या तुलनेवर अभिषेकचं वक्तव्य

दरम्यान, या पोस्टनंतर देखील उर्वशीला लोकांनी ट्रोल केलं आहे कारण तिनं काही वेळानंतर ही पोस्ट डिलीट केली. ती कधी सुधारणार नाही असं लोकांनी म्हटलं. तिनं या पोस्टमध्ये देखील ‘डाकू महाराज’ या तिच्या चित्रपटाचा उल्लेख केला. 

Read More