Marathi News> मनोरंजन
Advertisement

वरूण धवनवर मोठा आघात, जवळच्या व्यक्तीचं निधन

जवळच्या व्यक्तीचं अचानक जाण चटका लावणारं 

वरूण धवनवर मोठा आघात, जवळच्या व्यक्तीचं निधन

मुंबई : बॉलिवूड अभिनेत वरूण धवन (Varun Dhawan) वर दुःखाचा डोंगर ओढावला आहे. वरूण धवनच्या अगदी जवळच्या व्यक्तीचं आकस्मित निधन झालं आहे. वरूण धवन आणि त्याच्या कुटुंबियांसाठी हा खूप मोठा धक्का आहे. 

वरूण धवनच्या ही जवळची व्यक्ती म्हणजे त्याच्या गाडीचा चक्रधर, ड्रायव्हर मनोज. मनोज यांचे हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. 

मेहबुब स्टुडिओत घडली घटना 

मनोज वांद्रा येथील मेहबुब स्टुडिओत असताना ही घटना घडली. मनोज यांच्या अचानक छातीत दुःखू लागलं. वरूणसह सगळ्यांनी त्याला जवळच्या लिलावती रूग्णालयात दाखल केलं. जेथे मनोज यांना मृत घोषित केलं. 

वरूण धवन अतिशय दुःखी 

आपल्या जवळच्या व्यक्तीच्या जाण्याने वरूण धवनला खूप मोठा धक्का बसला आहे. बॉलिवुड लाइफने दिलेल्या माहितीनुसार, मनोज वरूण धवनच्या अतिशय जवळचे होते. वरूणच्या एका जाहिरातीच्या शूटकरता ते मेहबुब स्टुडिओत गेले होते. तेथे त्यांची अचानक तब्बेत बिघडली. 

मनोज यांच्या कुटुंबाची पूर्ण काळजी घेणार धवन 

ड्रायव्हरच्या मृत्यूमुळे वरुण धवन खूप दुःखात आहे. त्यालाही स्वतःला सांभाळणे कठीण जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, डेव्हिड धवन यांनी वरुण धवनला वचन दिले की, मनोजच्या कुटुंबाची काळजी घेतली जाईल. मनोज यांना दोन मुली आहेत. 

Read More