Marathi News> मनोरंजन
Advertisement

वरुण धवननं दत्तक घेतले सेलिब्रिटी 'पालक'!

वरुण धवन आपला आगामी सिनेमा 'स्ट्रीट डान्सर थ्रीडी'ची अपूर्ण राहिलेली शुटिंग पूर्ण करण्यासाठी लंडनमध्ये  

वरुण धवननं दत्तक घेतले सेलिब्रिटी 'पालक'!

नवी दिल्ली : दोनच दिवसांपूर्वी सेलिब्रिटी जोडी दीपिका पादूकोण आणि रणवीर सिंह रोमान्टिक अंदाजात विमानतळावर दिसले होते. हे दोघं लंडनला दाखल झालेत. इथं त्यांनी एका मुलाला दत्तक घेतल्याच्या बातम्या येत होत्या... परंतु, त्यांनी मुलाला नव्हे तर एका मुलानंच त्यांना पालक म्हणून दत्तक घेतल्याचं समोर येतंय. हा मुलगा दुसरा-तिसरा कुणी नाही तर अभिनेता वरुण धवन आहे.

वरुणनं दीपिका आणि रणवीरला आपलं 'दत्तक पालक' म्हणून संबोधलंय. वरुण धवनसोबत या दोघांचा एक सेल्फी व्हिडिओ समोर आलाय. या व्हिडिओत वरुण आपली दत्तक आई दीपिका आपली किती काळजी घेतेय हे सांगताना दिसतोय. हा मजेशीर व्हिडिओ दीपिका, रणवीर आणि वरुणच्या चाहत्यांना भलताच आवडलेला दिसतोय. कारण, उभा - आडवा काढलेला हा व्हिडिओदेखील सोशल मीडियावर व्हायरल झालाय.  

दीपिका-रणवीर सध्या लंडनमध्ये फिरत आहेत तर वरुण धवन आपला आगामी सिनेमा 'स्ट्रीट डान्सर थ्रीडी'ची अपूर्ण राहिलेली शुटिंग पूर्ण करण्यासाठी लंडनमध्ये पोहचलाय. 

fallbacks
कलंक

वरुण 'कलंक'च्या टीझर प्रदर्शनासाठी भारतात आला होता... हा टीझर प्रदर्शित झाल्यानंतर ताबडतोब तो लंडनला परत गेला. 

Read More