Marathi News> मनोरंजन
Advertisement

रॅपर बादशाहाचा फोटो पाहताच वरूण म्हणाला...

फोटोमध्ये त्याचा चेहरा उन्हामुळे जळाल्याचं दिसतं आहे. 
   

रॅपर बादशाहाचा फोटो पाहताच वरूण म्हणाला...

मुंबई : प्रसिद्ध रॅपर बादशाहाचा  (Rapper Badshah) एक फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये त्याचा चेहरा उन्हामुळे जळाल्याचं दिसतं आहे. सुट्यांचा आनंद लूटण्यासाठी मालदीवमध्ये आहे. पण या दरम्यान त्याला 'सनबर्न'चा फटका बसला. त्याच्या चेहऱ्यावर याचा परिणाम झाला आहे. बादशाहने त्याच्या इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Sunburnt

A post shared by BADSHAH (@badboyshah) on

त्याचा असा फोटो पाहून चाहते देखील आश्चर्य व्यक्त करत आहेत. इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या त्याने फोटोला सनबन्ट्र असं कॅप्शन दिलं आहे. त्याच्या अशा फोटोवर चाहतेच नाही तर कलाकारही प्रतिक्रिया देत आहेत. पोस्टवर गायक अरमान मलिकने प्रतिक्रिया देत म्हटलं की, 'बॅड बर्न.'

तर आता अभिनेता वरूण धवनने देखील बादशाहच्या फोटोवर प्रतिक्रिया दिली. काही दिवसांपूर्वी वरूण देखील सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी मालदीव गेला होता. त्याला देखील सनबर्नचा सामना करावा लागला होता. अशी टिप्पणी करत 'माझ्या सोबत देखील असं झालं होतं' असं तो म्हणाला आहे.

Read More