Marathi News> मनोरंजन
Advertisement

...म्हणून निळू फुलेंची मुलगी म्हणतेय, डोन्ट वरी बाबा!

मनाने अजूनही माझ्याबरोबर... 

...म्हणून निळू फुलेंची मुलगी म्हणतेय, डोन्ट वरी बाबा!

मुंबई : काही कलाकार हे जसे त्यांच्या कलाकृतीमुळं प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतात त्याचप्रमाणं या कलाकारांना त्यांच्या स्वभावामुळंही जनमानसांत खास स्थान मिळतं. अशाच कलाकारांमधील एक नाव म्हणजे दिवंगत ज्येष्ठ अभिनेते निळू फुले यांचं. त्यांचं नाव घेतलं की, त्यांनी साकारलेल्या काही भूमिका आणि त्यांनी अजरामर केलेले काही डायलॉग यांच्या आठवणींना सर्रास उजाळा दिला जातो. 

अशा या सर्वांच्याच मनात कायम असणाऱ्या निळुभाऊंचा ११ वा स्मृतीदिन नुकताच पार पडला. याच दिवसाचं औचित्य साधत त्यांच्या मुलीनं म्हणजेच अभिनेत्री गार्गी फुले थत्ते हिनं आपल्या वडिलांसाठी एक भावनिक पोस्ट लिहिली. 

गार्गीनं लिहिलेली ही भावनिक पोस्ट खऱ्या अर्थानं खास होती, कारण या माध्यमातून तिनं आपल्या वडिलांना एक हमी दिल्याचं पाहायला मिळालं. सोशल मीडियावरही तिची ही पोस्ट बरीच व्हायरल झाली. 'बाबा, आज तुला जाऊऩ ११ वर्षे झाली. शरीरानं कुठेतरी लांब गेलास पण, मनाने अजूनही माझ्याबरोबर आहेस आणि राहशील. सतत सांगत राहशील, नन्या बाकी कशीही राहा, कुठेही राहा पण आपण समाजाचं देणं लादतो हे विसरु नकोस. डोन्ट वरी बाबा, तू दिलेली माणुसकीची शिकवण मी कधीही विसरणार नाही', असं तिनं या पोस्टमध्ये लिहित बाबांनी दिलेल्या शिकवणुकीचा आपल्याला कधीही विसर पडणार नसल्याचा शब्द दिला. 

fallbacks

 

एक कलाकार म्हणून निळू फुले यांनी प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला होताच. पण, व्यक्ती म्हणूनही त्यांनी आपल्या आचरणातून कायमच इतरांपुढे आदर्श ठेवला. त्यांची हिच शिकवण शक्य त्या परिनं पुढं सुरु ठेवण्याचा प्रयत्न करत त्यांची मुलगी गार्गी हा वारसा पुढं चालवत आहे.  

 

Read More